कोरोना महामारी मध्ये कर्तव्य बजावत हुतात्मा झालेल्यांना श्रद्धांजली

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 17 ऑगस्ट 2021 :- संगमनेर येथे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून मुस्लिम स्वयंसेवक संघाच्या वतीने ध्वजारोहण करून कोरोना महामारी मध्ये विविध क्षेत्रांत कर्तव्य बजावत असताना आपल्या प्राणाची आहुती देऊन देशासाठी बलिदान दिलेल्या अश्या सर्व राष्ट्राच्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ कोविड हुतात्मा स्मृती चिन्हापुढे विविध क्षेत्रातील मान्यवराच्या हसते श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच शासकीय अधिकारी, कर्मचारी, व्यापारी व मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली वाहण्यात आली.

यानंतर मुस्लिम स्वयंसेवक संघाच्या वतीने कोरोना हुतात्मा देशभक्ती कृतज्ञता प्रभात फेरी चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मुस्लिम स्वयंसेवक संघाच्या महिला व पुरुष स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत उपविभागीय अधिकारी कार्यालयापासून बस स्थानक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज व महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करत सय्यद बाबा चौकात हजरत सय्यद बाबा यांच्या दर्गाहला फुल चादर अर्पण करून सदर कोरोना हुतात्मा देशभक्ती प्रभात फेरीची सांगता करण्यात आली.

यावेळी उपविभागीय दंडाधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, संगमनेर तहसिलदार अमोल निकम, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, तहसिलदार अकोले, मुकेश कांबळे, उपविभागीय कृषी अधिकारी सुधाकर बोराळे, संगमनेर शहराचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, महसूलचे नायब तहसीलदार उमाकांत कडनोर,

मुस्लिम स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहसिन मनियार, माहिती प्रवाह ट्रस्टचे मुख्य व्यवस्थापक दीपक पाचरणे, फादर रेव्ह. विकास संगमे, अमर कतारी, रमेश काळे, अमनज्योतसिंग पंजाबी, अनिल भोसले, संगमनेर तालुका केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष चेतन कर्डिले, उपाध्यक्ष महेश अभंग,

सेक्रेटरी संदेश जाजू, सागर शिंदे, इम्रान शेख, भारत रेघाटे, गोरक्ष नेहे, आदित्य घाटगे, भाऊसाहेब वैद्य, सादिक तांबोळी आदी सह प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कोरोना हुतात्म्यांच्या स्मृतिचिन्हास पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली यावेळी मुस्लिम स्वयंसेवक संघाच्या वतीने जेष्ठ समाजसेवक अब्दुल्लाह हसन चौधरी,

डॉ.जी. पी. शेख, निसारखान पठाण, शब्बीर मोमीन, रफीक सय्यद, मुनव्वर सर, कादर इनामदार, हुसैन पटेल, मोहम्मद तांबोळी, मुख्तार पिंजारी, अनिस नवाब शेख, फिरोज शेख, मुजम्मील शेख, सलमान शेख, दानिश पठाण, इर्शाद पठाण, शाहरुख रंगरेज, फैजान मनियार, अफ्फान शेख, रेहान शेख, अरहान शेख, अरमान पठाण, दानिश मनियार, मोहम्मद अली मनियार, जमीर शेख, अरबाज शेख, फैसल शेख, जावेद शेख, इर्शाद शेख,

मुदस्सर शेख, शौकत पठाण, बानोबी शेख, मुमताज पठाण, सविता दिघे, लक्ष्मीबाई कोन्का, रेश्मा शेख, मैमुना शेख, हुमैरा शेख, करिष्मा शेख, मसीरा शेख, सानिया पठाण, सायरा शेख, सुरैय्या शेख, शमा शेख, सकीना पठाण आदीसह पुरुष व महिला स्वयंसेवकांनी उत्स्फूर्ततेने प्रभात फेरी मधे सहभाग घेतला होता.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24