अहमदनगर Live24 टीम, 11 सप्टेंबर 2021 :-केस तीन विविध टप्प्यांवर एका विशेष वृद्धी चक्काचं अनुसरण करतात. प्रत्येक चरणाची निश्चित विशेषता असते, जी केसांच्या लांबीला निर्धारित करते. हे तीन चरण एनाजेन, कॅटाजेन, टेलोजेन असतात. आपल्या डोक्यावरील साधारण ८५ टक्के केस प्रत्येक वेळेस एनाजेन टप्प्यातील असतात.

 केस गळण्याची प्रमुख कारणे : – तणाव, दीर्घ आजार, दुःखद घटना, भावनात्मक तणाव, गर्भावस्था आणि दुग्धपान टेलोजन फ्लुविया. अँनिमिया, हायपोथायरॉइज्डिजम, जीवनसत्त्व ब,ड ची कमतरता, केमोथेरपी, डमेंटाइटिस डँडूफची समस्या, अन्न व्यवस्थित न पचणे. ऑटोइम्युन डिसीज, औषधं, रक्त पातळ करणारी तणावरोधी, खुप जास्त स्टाईल यामुळे केस गळतात. केसांना कलर करण्यासाठी केमिकल कलरचा अधिक वापर करणंही हानिकारक ठरते. हार्मोन असंतुलल आणि लडठपणा ही सुद्धा काही कारणं आहेत.

पुरुषांमध्ये वेगळी कारणे : – मुलांमध्ये मेल हार्मोन्स वाढल्याने केस गळू लागतात. पुरुषांमध्ये टक्कल पडते, त्यास एलोपेशिया न असं म्हणतात, कारण आजाराचं कारण पुरुष यौन हार्मोन एंड्रोजन मध्ये लपलेलं आहे. » महिलांमध्ये वेगळी कारणे : – महिलांची शरीर थायरॉइड, स्ट्रेस हार्मोनविषयी अधिक संवेदनशील असते. याशिवाय यामध्ये लोहाची कमतरता आढळते. मासिक पाळीदरम्यना खुप रक्तस्राव होण्याने केस गळण्याची समस्या निर्माण होते.

हे लक्षात ठेवा : – कोमट पाणी आणि चांगल्या प्रोटीन आधारित शॅम्पूने केस नियमितपणे धुवा. ओले केस विंचरू नका. केस खूप घट्ट बांधू नका. हाय पोनीटेल, टाइट बन करताना मुळं खेचली जाणार नाहीत, याची काळजी घ्या. प्रथिनं, जीवनसत्त्व, लोह, बायोटीन भरपूर प्रमाणात असणार्‍या आहाराचं सेवन करणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

घरगुती उपाय फायदेशीर : – नारळाचं दूध, कोरफड, आवळा, आल्याचा रस, दही यांचा वापर शॅम्पू करण्यापूर्वी साधारण अर्धा तास आधी करण्याने केस कंडिशनर आणि मॉइश्चराइज होण्यास मदत होते. ग्रीन टी सोल्यूशनचा वापर शॅम्पूनंतर कंडिशनरच्या रूपात करता येतो.

अन्न व्यवस्थित पचन आवश्यक : – आहारात प्रथिनं, लोह, कॅल्शियमची कमतरता, ऑरटोइम्युन डिसीज ही केस गळण्याची कारणं आहेत. योग्य पोषक आहाराच्या कमतरतेशिवाय अन्न व्यवस्थित न पचण्याने केस गळण्याची समस्या निर्माण होते. अशावेळेस जेव्हा आपण डॉक्टरांकडे जातो, तेव्हा ते काही औषधं घेतो.

pतर यामुळे काही ठिक होत नाही. जर समस्या आतून असेल तर मुळापासून समस्या निट करणे आवश्यक आहे. केस गळण्याचं नेमकं कारण लक्षात घेऊन त्यावर इलाज करणे आवश्यक आहे. काही जणांमध्ये मका, गहू, शेंगदाणे इत्यादी खाण्याने अँलर्जी होऊ शकते. काही जणांना दूध किंवा अन्य उत्पादनांमुळे अलर्जी होऊ शकते. फूड इन्टॉलरन्स टेस्टच्या माध्यमातून हे समजते की, कोणते पदार्थ पचण्यासाठी व्यक्तीला समस्या होत आहे. त्या पदार्थांपासून दूर राहायला हवं. तसंच कोणाताही पदार्थ अतिप्रमाणात खाणं टाळायला हव॒.

 रोखण्यासाठी रोज हे खा : – केस गळती रोखण्यासाठी प्रथिनं, लोह, बायोटिन, ओमेगा ३ फॅटी असिड आहारात असणं आवश्यक आहे. हे सगळे घटक आहारात समप्रमाणात हवेत. पालेभाज्या, अर्धा चमचा भिजवलेले मेथीचे दाणे, एक चमचा जवसाच्या बिया त्याचबरोबर एक लिंबू, काकडी, टोमॅटो, गाजर, एक मूठ फुटाणे किंवा सुकामेवा याबरोबर २-३ लिटर पाणी पिणं गरजेचं आहे.