अहमदनगर Live24 टीम, 6 ऑगस्ट 2021 :- ॲट्रोसिटीचा दाखल केलेला गुन्हा मागे घेण्यासाठी पीडित कुटुंबीयांना जिवंत जाळण्याचा धक्कादायक श्रीगोंदा तालुक्यातील कोथुळ येथे घडला.
या प्रकरणी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदविला असता, दुसऱ्या दिवशी ॲट्रोसिटीचा गुन्हा मागे घे म्हणून आरोपीच्या नातेवाईकांनी फिर्यादीच्या पतीस शेतात अडवून शिवीगाळ करत धमकी दिली.
श्रीगोंदा तालुक्यातील कोथुळ येथे जागेच्या वादातून वाद होउन झालेल्या भांडणात एका कुटुंबावर हल्ला झाला होता. याप्रकरणी ५ जणांवर ॲट्रोसिटी कायद्यान्वये बेलवंडी पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल होऊन दीड महिना उलटून देखील आरोपी गावात सर्रास फिरत असून, त्यांना अद्याप अटक करण्यात आली नाही. पिडीत कुटुंबीयांना धमकावून त्यांच्यावर दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न आरोपी करत आहेत.
दि.२ ऑगस्ट रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ॲट्रोसिटीचा गुन्हा मागे घेण्यासाठी या कुटुंबातील काही सदस्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला.