Tulsi vivah 2021 : जाणून घ्या तुळशी विवाहाचा संपूर्ण विधी, विवाह मुहूर्त

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tulsi vivah 2021 :- दिवाळी ही खर्‍या अर्थाने संपते ती तुळशीचे लग्न झाल्यावर. तुळशी विवाह कार्तिक शुद्ध एकादशीपासून प्रारंभ होऊन कार्तिक पौर्णिमेपर्यंत केले जातात. यंदाच्या वर्षी तुळशीविवाह १५ नोव्हेंबरला आहे.

जाणून घ्या तुळसी विवाहाची तयारी, साहित्य, पुजा विधी, शुभ मुहूर्त, विवाहाची योग्य पद्धत… तुळशी विवाहासाठी साहित्याची यादी: मुळा, आवळा, मनुका, रताळे, शिंगाडे, चिंचा, कोथिंबीर, पेरू आणि इतर हंगामातील फळं, मंडप तयार करण्यासाठी ऊस, भगवान विष्णूची मूर्ती,

तुळशीचे रोप, धूप, दिवा, कपडे, हार, झेंडूचे फुले, श्रृंगार साहित्य, हळद, ओढणी किंवा लाल रंगाचे वस्त्र, ओटी भरण्यासाठी साडी, चोळी, नथ, दागिने घालावे. मंगळसूत्र, जोडवी, खणा-नाराळ, मध, तीळ, एक कप दूध,

पूजा विधी

पूजेच्या वेळी काही विशेष गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

अंगणामध्ये असणाऱ्या तुळशी वृंदावनाला सजवावं. त्यापुढे रांगोळी काढावी.

दाराला तोरण व मांडव म्हणून ऊसाची वा धांडयाची खोपटी ठेवावी.

या दिवशी तुळशीला मध आणि लाल ओढणी अर्पित करावी.

तुळशीची आपल्या परंपरेनुसार साडी, चोळी, नथ, दागिने घालावे. मंगळसूत्र, जोडवी, खणा-नाराळाने ओटी भरावी.

तुळशी वृंदावनात शालीग्राम ठेवून तीळ अर्पण करावे.

एकादशीच्या दिवशी तुळशी आणि शालिग्राम दुधात भिजवलेल्या हळदीचे टिळक करावे.

पूजेनंतर 11 वेळा तुळशीची प्रदक्षिणा घालाव्या. प्रदक्षिणा घालताना हातात अक्षता ठेवाव्या. रिकाम्या हाताने प्रदक्षिणा घालू नका.

मुहूर्तानुसार बाळकृष्ण व तुळस या दोघांमध्ये अंतरपाट धरुन मंगलाष्टके म्हणून त्यांचा विवाह लावावा.

यानंतर नैवेद्य अर्पण करावं आणि कुटुंबातील सर्व सदस्यांना वितरित करावं.

पूजा झाल्यावर भगवान विष्णूंना जागे होण्याचे आवाहन करा.

थाळी वाजवून देखील भगवान विष्णूला जागे होण्याचे आवाहन करता येतं.

तुळशी विवाह मुहूर्त: एकादशी तिथी प्रारंभ- १५ नोव्हेंबर २०२१ सकाळी ०६.३९ वाजता एकादशी तिथी समाप्ती – १६ नोव्हेंबर २०२१ सकाळी ०८.०१ वाजता १५ नोव्हेंबर, सोमवार रोजी तुळशी विवाह- दुपारी १.१० वाजल्यापासून दुपारी ३.१९ वाजेपर्यंत