अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2021 :- तुलसी विवाह हा दरवर्षी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी दिवशी साजरा केला जातो. यंदा कार्तिकी एकादशी म्हणजेच देव उठनी एकादशी ही 15 नोव्हेंबर दिवशी आहे.
या दिवसापासून तुलसी विवाह साजरा केला जाऊ शकतो. हिंदू धर्मामध्ये तुळशीला विशेष महत्त्व आहे. पंचांगानुसार कार्तिकी एकादशीला सारी धार्मिक सुरू होतात.
चातुर्मासाचा काळ संपतो आणि पुन्हा मंगलपर्व सुरू होते. लग्नाळू तरूण-तरूणांच्या विवाहाचे देखील या तुलसी विवाहापासून बार उडवले जातात.
मग पहा धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या या पावन पर्वामध्ये कधी पासून कधी पर्यंत यंदा तुलसी विवाह साजरा केला जाऊ शकतो?
यंदा तुलसी विवाह आरंभ 15 नोव्हेंबर पासून होणार असून 19 नोव्हेंबर दिवशी तुलसी विवाह समाप्ती आहे. त्यामुळे यंदा 15 ते 19 अशा 5 दिवसांमध्ये तुम्ही कधीही तुलसी विवाह सोहळा पार पाडू शकता.
कसे कराल तुळशीचं लग्न तुळशीच्या रोपाची घरात रुजवणी केल्यानंतर सुमारे 3 वर्षांनी तिचा विवाह करण्याची पद्धत आहे. तुळशीच्या विवाहादिवशी तुळशीला नववधूप्रमाणे नटवले जाते.
तुळशीभोवती रांगोळी काढून वृंदावनात ऊस पुरून त्यामध्ये आवळा, चिंच, बोरं, उसाची दांडी, हळकुंड आणि हिरव्या बांगड्या ठेवल्या जातात.
तुळशीच्या चारी बाजूंनी ऊसाचा मंडप उभारला जातो. सोबतच विष्णुस्वरूप श्रीबाळकृष्णाची पूजा केली जाते .
घरात शाळीग्राम दगड असल्यास त्याच्यासोबत किंवा घरातील किशोरवयीन मुलासोबत मंगलाष्टाकाच्या घोषात तुळशी विवाह संपन्न होतो. यानंतर घरात गोडाधोडाच्या पदार्थाचे वाटप केले जाते.