अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :- नेवासा तालुक्यातील भेंडा येथे रविवार दि. २ एप्रिल रोजी रात्री ९:२० वाजता झालेल्या गोळीबार प्रकरणाला आता सूडनाट्याचे वळण आले आहे.
मुलीच्या कारणावरून व घटनेतील जुन्या वादातील लोकांना अद्दल घडविण्याच्या उद्देशाने जखमी सोमनाथ तांबे यांच्या मित्रांनीच गोळीबार नाट्य घडवून आणल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी नेवासा पोलिसांनी शुभम विश्वनाथ गर्जे, स्वप्नील बाबासाहेब बोधक, अमोल राजेंद्र शेजवळ, अमोल अशोक गडाख, अक्षय रामदास चेमटे यांच्यासह एकूण १० आरोपींना अटक केली असून एक गावठी कट्टा हस्तगत केला असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विजय करे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या तपासात श्रीरामपूरच्या अप्पर पोलिस अधीक्षक डॉ . दीपाली काळे यांची महत्त्वाची भूमिका ठरली. पोलिसांनी बनाव रचलेल्यांना सोमवारी रात्री ताब्यात घेतले.
भेंडे येथे रविवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास व्हॉलीबॉल खेळताना झालेल्या गोळीबारात सोमनाथ बाळासाहेब तांबे ( २९, रा. भेंडे) हा तरुण जखमी झाला. या तरुणाने या प्रकरणी नेवासे पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत कुकाण्यातील दोघांची नावे संशयित म्हणून नमूद केली.
पोलिसांनी कुकाण्यातील दोघा संशयिताना रात्रीच ताब्यात घेतले. सोमवारी श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. काळे यांनी घटनास्थळाची पाहणी केली. कुकाणे पोलिस दूरक्षेत्रात पोलिस निरीक्षकांसह स्थानिक पोलिसांना या प्रकरणी सर्व बाजूंनी तपास करण्याच्या सूचना केल्या.
त्याप्रमाणे पोलिस यंत्रणा कामालाही लागली.पोलिसांच्या तपासात या प्रकरणाची उकल झाली हा प्रकार पूर्ववैमनस्यातून शत्रूला गंुतवण्यासाठी घडवून आणल्याचे तपासात पुढे आल्याने पोलिसांनी तपासाची दिशा बदलवत व्हॉलिबॉल खेळत असलेल्या
काही मित्रांचीच साखळी या प्रकरणात असल्याचे दिसताच रात्री काहींना ताब्यात घेतले. कुकाण्यातील दोघांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांशी गेल्या दोन महिन्यांपूर्वी मारामारी झाली होती
याचा राग मनात धरून शत्रूला गुंतवण्यासाठी गोळीबार करण्याचा व त्यात शत्रूला गुंतवण्याचा कट रचण्यात आल्याचे पुढे येत आहे. सर्व अकरा खेळाडू यामुळे पोलिसांच्या रडारवर आले आहेत. या सर्वांचीच चौकशी पोलिस यंत्रणा करत आहे.