TVS Sport Bike : तुम्हाला नवीन बाईक खरेदी करायची असेल आणि तुमचे बजेट कमी असेल तर काळजी करू नका. आता तुम्ही अवघ्या 7 हजार रुपये भरून TVS Sport बाईक खरेदी करू शकता. यात कंपनीकडून 70 kmpl मायलेज आणि दमदार फीचर्स देण्यात आली आहेत. त्यामुळे आजच स्वस्तात ही बाइक खरेदी करा. जाणून घ्या ऑफर आणि फीचर्स.
जाणून घ्या किंमत
TVS Sport चे बेस मॉडेल तुम्हाला स्वस्तात खरेदी करता येईल. ज्यात किक स्टार्ट फंक्शन अलॉय व्हील्स उपलब्ध करून दिले आहे. किमतीचा विचार केला तर या बेस व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत 64,050 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) इतकी आहे आणि ही किंमत ऑन रोड 75,082 रुपये होईल.
फायनान्स प्लॅन
तुम्हाला टीव्हीएस स्पोर्ट बेस मॉडेल रोख पेमेंटद्वारे खरेदी करायचे असल्यास तुम्हाला 75 हजार रुपये खर्च करावे लागणार आहेत. जर तुमच्याकडे इतके बजेट नसेल, तर काळजी करू नका. कारण आता तुम्ही फायनान्स प्लॅनद्वारे तुम्ही केवळ 7000 रुपये देऊन ही बाईक खरेदी करू शकता.
ऑनलाइन फायनान्स प्लॅन कॅल्क्युलेटरनुसार, जर तुमच्याकडे 7000 रुपये असतील तर या रकमेच्या आधारे तुम्हाला बँक 68,082 रुपयांचे कर्ज देऊ शकते ज्यावर बँक वार्षिक 9.7 टक्के दराने व्याज आकारला जाईल. त्यानंतर कर्ज मंजूर झाल्यानंतर, तुम्हाला 7000 रुपये डाउन पेमेंट जमा करावे लागणार आहे. आणि त्यानंतर तुम्हाला पुढील 36 महिन्यांसाठी 2,187 रुपये मासिक EMI भरावे लागतील.
जाणून घ्या मायलेज
कंपनीच्या या TVS Sport मध्ये, कंपनीने सिंगल सिलेंडर 109.7cc इंजिन स्थापित केले असून जे 8.29 PS पॉवर आणि 8.7 Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम असणार आहे. या इंजिनसोबत 4 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स जोडण्यात आला आहे. या बाईकचे मायलेज 70 किलोमीटर प्रति लिटर आहे जे ARAI ने प्रमाणित केले आहे, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.