TVS iQube Electric Scooter : भारतीय बाजारात आणि भारतीयांच्या मनात TVS स्कुटरच्या चांगली प्रतिमा आहे. त्यामुळे या कंपनीच्या स्कुटरची विक्री मोठ्या प्रमाणात होते.
आता लवकरच ही कंपनी ॲमेझॉनसोबत एक नवीन प्रवास सुरु करणार आहे. जर अॅमेझॉनची साथ मिळाली तर कंपनीच्या विक्रीमध्ये आणखी वाढ होईल.
स्कुटरची जादू
TVS लवकरच लोकप्रिय ऑनलाइन शॉपिंग साइट ॲमेझॉनच्या सोबत एक नवीन प्रवास सुरू करणार आहे. यामुळेच या वाहनांची व्याप्ती खूप वाढली आहे. कारण TVS ची इलेक्ट्रिक स्कूटर इतर मॉडेल्सपेक्षा जबरदस्त मायलेज आणि फीचर्स देणारी आहे.मुख्यतः ही कंपनी त्यांच्या चांगल्या दर्जासाठी आणि लुकसाठी ओळखले जाते. ही स्कुटर फक्त 80000 रुपयांमध्ये 100 किमी पेक्षा जास्त रेंज देत आहे.
TVS आणि Amazon चा करार
TVS ॲमेझॉनसोबत एक करार करेल हा करार सुमारे ३ वर्षांसाठी मर्यादित असेल या करारानुसार कंपनी आपली तब्बल 10000 वाहने ही Amazon ला देईल. पर्यावरणात बरीच सुधारणा, पेट्रोलचा खर्च त्याच बरोबर सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कंपनीने ही योजना आणली आहे.
फीचर्स
या स्कूटरची रेंज इको मोडसह 145 किमी आणि स्पोर्ट्स मोडमध्ये 110 किमी इतकी असून त्याचा मोटर प्रकार BLDC आहे. यामध्ये 4400 वॅट्सची मोटर पॉवर आहे. जर या स्कूटरच्या ब्रेकबद्दल सांगायचे झाले तर समोरच्या चाकामध्ये डिस्क ब्रेक देण्यात आला आहे आणि त्याच्या मागील चाकामध्ये ड्रम ब्रेक देण्यात आले आहेत. ही स्कुटर 2 तास 50 मिनिटांत 80 टक्के चार्ज होते.
तपशील
रेंज: 145 KM |
मोटर पॉवर: 4400 |
मोटर टाइप: BLDC |
फ्रंट ब्रेक: डिस्क |
रियर ब्रेक: ड्रम |
चार्जिंग वेळ: 2.50 तास |
किंमत : 1.61 – 1.61 लाख |