अहमदनगर Live24 टीम, 2 सप्टेंबर 2021 :- स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने बिंगो जुगार अड्ड्यावर छापा टाकून 12 जणांवर गुन्हा दाखल केल्याची कारवाई नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे करण्यात आली आहे.
यावेळी या 12 जुगाऱ्यांकडून 87 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, स्थानिक गुन्हा अन्वेषणचे पोलिसांना कुकाणा येथे संगणकावर बिंगो जुगार खेळवला जात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी जात छापा टाकून बारा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
1) भागवत गिनदेव बनवे वय-21 रा. आखारबाग पाथर्डी 2) लक्ष्मण बन मासाळकर वय 20 रा. नाथनगर पावडी 3) सचिन राम साळवे वय 20 रा.तेलकुडगाव ता. नेवासा, 4) संजय कुंडलिक घाडगे वय 32 रा. तेलकुडगाव ता. नेवासा 5) गणेश मोहन वावळे वय 26 रा.अंतरवली ता. नेवासा,
6) नामदेव रामभाउ सरोदे वय 31 रा. अंतरवली ता.नेवासा 7) स्वप्निल सुभाष गोर्डे वय 36 रा.कुकाणा ता. नेवासा, 8) विलास एकनाथ आहेर 31 रा.दहेगाव ता.शेवगाव 9) संकेत विष्णू गर्जे वय 19 वडुले ता.
नेवासा 10) अशोक विठ्ठल चावरे वय-30 रा.दहेगावने, 11) मंदिर हरीभाऊ काळे वय 40 रा. तेलकुडगाव ता. नेवासा, 12) अंकुश उत्तम पुढे २७,
13) नितिन शिवाजी धोत्रे रा. विजयनगर पाथर्डी (फरार) हे बिंगो नावाच्या हारजितीचा जुगार खेळतांना व खेळवितांना 87 हजार 400 रुपयांच्या मुद्देमालसह मिळून आले. या सर्वांवर गुन्हा दाखल करुन कारवाई करण्यात आली.