अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :-जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे सात एकर लिंबू बागेतील लिंब सुमारे दहा ते वीस चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना श्रीगोंदातील औटीवाडीमध्ये घडली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी कि शहरातील औटीवाडीमधील तलावाच्या लगत असलेल्या औटी बंधू यांच्या सात एकर लिंबू बागेतील लिंब सुमारे दहा ते वीस चोरट्यांनी रात्रीच्या सुमाराला काठ्याच्या साह्याने झोडून हे लिंब घेऊन पोबारा केला.
लिंबू एक किलोला सत्तर ते शंभर रुपयेपर्यंत भाव असताना ऐन हंगामात ही चोरी झाल्याने शेतकऱ्यांचे साधारणपणे दहा ते बारा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे
माजी नगरसेवक दादासाहेब औटी तसेच त्यांचे बंधू प्रदीप औटी आणि अरुण औटी या तिघांच्या बागेतील लिंबू चोरट्यांनी चोरून नेली आहे.
याबाबत सकाळी शेतात गेल्यावर त्यांना हे लक्षात आले. दुपारी पोलीस स्टेशनला येऊन याबाबत फिर्याद देणार असल्याचे त्यांनी सांगितले.