अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-संगमनेर तालुक्यातील सायखिंडी शिवारात एका 28 वर्षीय तरुणाचा चाकूचे वार करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे.
सचिन अरविंद शिंदे (वय 28, रा. मोठेबाबामळा, सायखिंडी, ता. संगमनेर) असे मयत तरुणाचे नाव आहे.
याबाबत मयताचे वडील अरविंद शिंदे यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून तालुका पोलीस ठाण्यात दोन अज्ञात तरुणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान मयत तरुणाच्या वडिलांनी फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, दि. 24 एप्रिल रोजी रात्री नऊच्या वाजेच्या सुमारास मोठेबाबामळा वस्तीवर सचिन यास बोलविण्यास दोन तरुण मोटारसायकलहून आले.
त्याला बोलावून घेऊन त्यास मोटारसायकलवर बसवून सोबत नेले. सायखिंडी शिवारात सोमनाथ पारधी यांच्या शेतात सचिन याच्यावर धारधार चाकूने मानेवर व डोक्यावर वार करून त्याची निर्घृण हत्या केली.
खुनाची माहिती समजताच पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. अरविंद शिंदे यांनी दिलेल्या
फिर्यादीवरुन तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात दोन तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक आर. एस. सानप हे करत आहे.