ताज्या बातम्या

Twitter Verification : आज पुन्हा लाँच होणार ट्विटर ब्लू सर्व्हिस, काय काय मिळणार फायदा जाणून घ्या

Published by
Ahmednagarlive24 Office

Twitter Verification : मायक्रोब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरवर महत्त्वाचे अकाउंट ओळखण्यासाठी ब्लू टिक म्हणजेच वापरकर्त्यांना ब्लू बॅज दिले जातात. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणजे इलॉन मस्क यांनी ट्विटर $44 अब्जांना विकत घेतले आहे.

अशातच पुन्हा एकदा ट्विटर त्याचे आजपासून ब्लू पेड सबस्क्रिप्शन सुरू करणार आहे. विशेष म्हणजे ट्विटर एका महिन्याच्या अंतरानंतर ही सेवा सुरू करत आहे.

या सर्व्हिसमध्ये सरकार, कंपन्या आणि सर्वसामान्यांना वेगवेगळे बॅज दिले जाणार आहेत. म्हणजेच थोडक्यात सांगायचे झाले तर, सरकारला ग्रे चेक मिळेल, कंपन्यांना सोन्याचा चेक मिळेल आणि सामान्य लोकांना ब्लू टिक मिळणार आहे.

ब्लू सबस्क्रिप्शनची किंमत महिन्याला $8 इतकी आहे. तर तुम्ही Apple च्या iOS वर खरेदी केल्यास, ते दरमहा $11 मध्ये उपलब्ध असणार आहे. यामागचे कारण म्हणजे Apple कडून आकारला जाणारा 30 टक्के कर.

वापरकर्त्यांना ट्विट एडिट करण्याची, एचडी गुणवत्तेमध्ये (1080p), रीडर मोड आणि ब्लू चेकमार्कमध्ये व्हिडिओ अपलोड करता येणार आहेत. याशिवाय रिप्लाय, उल्लेख आणि शोध याला प्राधान्य दिले जाणार आहे.

सामान्य वापरकर्त्यांच्या तुलनेत, 50 टक्के कमी जाहिराती पाहिल्या जातील आणि नवीन फीचर्सना प्राधान्य मिळेल. ब्लू टिकची मागणी करणाऱ्या युजर्सच्या अकाऊंटचे अगोदर सखोल पुनरावलोकन केले जाईल.

फोटो किंवा नाव बदलल्यानंतर ब्लू टिक काढण्यात येईल

सब्सक्राइबरने त्याचे प्रोफाइल, फोटो किंवा नाव बदलले तर त्याची ब्लू टिक तात्पुरती काढून टाकली जाईल. पुन्हा पडताळणी केल्यानंतरच टिक देण्यात येईल. ट्विटरच्या या निर्णयामागचे कारण म्हणजे जे कोणत्याही विशिष्ट मोहिमेमध्ये किंवा निषेधामध्ये त्यांचे प्रोफाइल फोटो किंवा नाव बदलतात त्या वापरकर्त्यांवर कारवाई करणे आहे.

भारतात मोजावे लागतील इतके पैसे

भारतातील काही ट्विटर वापरकर्त्यांना 10 नोव्हेंबरच्या रात्री ब्लू सबस्क्रिप्शनसाठी Apple Store वर एक पॉप-अप आढळला. यामध्ये ट्विटर ब्लू सबस्क्रिप्शनची मासिक किंमत 719 रुपये नमूद करण्यात आली होती. परंतु याबाबत अजूनही अधिकृतपणे माहिती जाहीर करण्यात आली नाही.

9 नोव्हेंबर रोजी ट्विटरने चेक मार्क बॅजसह ट्विटर ब्लू लॉन्च केला होता. दोन दिवसांनंतर, सोशल मीडियावर बनावट खात्यांमुळे ट्विटर ब्लू साइनअप थांबवण्यात आले. माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या नावाने टेस्लामध्ये बनावट खाती तयार करून लोकांकडून ब्लू सबस्क्रिप्शन घेण्यात आले होते.

Ahmednagarlive24 Office