अहमदनगर Live24 टीम, 22 मे 2021 :- नगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल असलेल्या दोन आरोपींना शुक्रवारी शहरातील मंगल गेट परिसरातून अटक केली.
अभिषेक ऊर्फ निखिल प्रताप गंगेकर व विवेक नागेश गंगेकर (रा. दोघे पंढरपूर, जि. सोलापूर), असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. दरम्यान या दोघांविरुद्ध पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, वरील दोन्ही आरोपींनी त्यांच्या साथीदारांनी पंढरपूर येथील शिवा रामा इंदापूरकर यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता.
घटनेनंतर आरोपी नगर शहरातील मंगल गेट परिसरात राहणाऱ्या त्यांच्या नातेवाइकांकडे लपून बसले होते. या आरोपींबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके
यांना माहिती मिळाल्यानंतर दोघांना अटक करण्यात आली. यावेळी आरोपींची एक कार जप्त करण्यात आली. आरोपींना पुढील कारवाईसाठी पंढरपूर शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.