अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-राज्याची स्थिती पाहता अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी असला तरी प्रशासनांकडून पाहिजे त्या खबरदारी घेण्यात येत आहे.
तसेच नियमांचा भंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे. गेल्या दोन दिवसात अहमदनगर जिल्ह्यातील 2 हजार 300 जणांवर कारवाई करण्यांत आली असुन साधरण 2 लाख 30 हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
मात्र परिस्थिती पाहता दंड महत्त्वाचा नसून नागरिकांनीही प्रशासनास सहकार्य करून कोरोनां मात देण्यासाठी मास्कचा वापर करावा असे आवाहन पोलिस अधीक्षक मनोज पाटील यां केले आहे.
महाराष्ट्रामध्ये वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता अहमदनगर जिल्ह्यात देखील दक्षता घेण्यात येत आहे. अशात अहमदनगर जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालय, विविध कार्यालय, संस्था, दुकाने या सर्वांनी आपल्याकड़े येणार्या नागरिकांनी मास्क लावलेले आहे
की नाही याची शहानिशा करून मास्क लावले असल्यास संबधितास दुकानात, कार्यालयात, महाविद्यालयात प्रवेश द्यावा अन्यथा प्रवेश देऊ नये त्यानुसार ’नो मास्क नो इन्ट्री’ अशा धोरणाची अंमलबजावणी केली
पाहिजे जेणे करून कोरोनाच्या चढत्या आलेखाला रोखण्यात आपण यश प्राप्त करू असं आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी जनतेला केल आहे.
ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |