Farmer succes story : राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून शेती व्यवसायात (Farming) मोठा बदल बघायला मिळत आहे. राज्यातील शेतकरी बांधव आता काळाच्या ओघात पीकपद्धतीत बदल करीत आहेत. आता राज्यातील अनेक शेतकरी बांधव फुल शेती करू लागले आहेत विशेष म्हणजे फुलशेतीच्या (Floriculture) माध्यमातून शेतकऱ्यांना (Farmers) चांगले लाखोंचं उत्पन्न (Farmers Income) देखील मिळत आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात फुल शेती केली जाते. जिल्ह्यातील पुरंदर तालुक्याचे मौजे दिवेगाव हे संपूर्ण गाव फुल शेती साठी विशेष ओळखले जाते. या गावात सर्वाधिक जेरबेराचे उत्पादन (Production of gerbera) घेतले जाते.
गावातील अनेक शेतकरी पॉलिहाऊस उभारून फुल शेती करू लागले आहेत. एकंदरीत काय शेती व्यवसायात काळाच्या ओघात बदल करणे अतिशय आवश्यक असल्याचे दिवे गाव येथील शेतकऱ्यांना उमजले असून आता या शेतकऱ्यांना लाखोंचा नफा मिळू लागला आहे. दिवेगाव येथील राहुल आणि सचिन झेंडे या दोन्ही बंधूंनी देखील फुलशेतीच्या माध्यमातून लाखो रुपये उत्पन्न कमावण्याची किमया साधली आहे. जरबेरा फुलशेतीमध्ये कायम नवनवीन बदल करीत हे दोघे भावंडे इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरीत आहेत.
मित्रांनो या दोघी भावंडांनी 30 गुंठे क्षेत्रावर पॉलिहाऊस उभारून जरबेरा शेती (Gerbera farming) सुरू केली आहे. खरे पाहता पुरंदर तालुका आधीपासूनच दुष्काळग्रस्त तालुका म्हणून ओळखला जातो. उन्हाळ्यात नेहमीच पुरंदर तालुक्यात पाण्याची कमतरता भासत असते.
अशा परिस्थितीत फुलशेतीच्या माध्यमातून लाख रुपये उत्पन्न कमी होणे म्हणजे मोठे जिकिरीचे काम आहे. मात्र या दोघी भावंडांनी पाणीटंचाईवर समाधान शोधण्यासाठी शेततळ्यांची उभारणी केली आहे.
पावसाळ्यात शेततळे भरून ठेवले जाते आणि उन्हाळ्यात या शेततळ्याच्या पाण्यातून जरबेराची उत्पादन घेतले जाते. या दोघा भावांना शेती मध्ये त्यांच्या परिवाराचे देखील अनमोल सहकार्य लाभत आहे. सध्या बुके तयार करण्यापासून ते लग्नसमारंभात किंवा अन्य छोट्या-मोठ्या कार्यक्रममध्ये सजावटीसाठी सर्वाधिक जरबेरा फुलांची मागणी होऊ लागली आहे. यामुळे जरबेरा शेती शेतकऱ्यांसाठी विशेष फायद्याची ठरत आहे.
या दोघा भावांना देखील याचा लाभ मिळाला आहे. सचिन आणि राहुल या दोघांनी रासायनिक खतांच्या वाढत्या किमती लक्षात घेता रासायनिक खतांना फाटा देत सेंद्रिय खतांचा जरबेरा फुलशेतीत वापर सुरु केला असून यामुळे त्यांना मोठा फायदा झाला आहे. सेंद्रिय खतांचा वापर केल्याने जरबेरा फुलांची गुणवत्ता सुधारली असून उत्पादनात वाढ झाली आहे शिवाय जमिनीची आरोग्य देखील अबाधित राखण्यास मदत होणार आहे. निश्चितच या दोघा भावांनी इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श रोवला आहे.