श्रीरामपुरात प्रतितास दोन कोरोनाबाधितांची होतेय नोंद

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2021:- जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. दिवसेंदिवस वाढत्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीमुळे प्रशासन देखील सतर्क झाले आहे.

जिल्ह्यतील रुग्णवाढीबरोबरच श्रीरामपूर तालुक्यातही करोना रुग्णांची संख्या वाढली असून तालुका करोनाच्याबाबतीत पाच नंबरवर येऊन पोहोचले आहे.

काल एकाच दिवसात तालुक्यात 52 रुग्ण आढळून आले आहेत. काल श्रीरामपूर तालुक्यातील जिल्हा रुग्णालयात 15, खासगी रुग्णालयांमध्ये 31 तर अँटीजेन चाचणी तपासणीत 06 असे 52 रुग्ण आढळून आले आहेत.

तर करोनाचे उपचार करून एकूण 21 रुग्णांना घरी पाठविण्यात आले आहे. तालुक्यात गेल्या दहा दिवसांत सुमारे 354 रुग्णांना करोनाची लागण झाली होती. तर त्यातील सुमारे 194 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहेत.

सध्या एकूण अंदाजे 160 रुग्ण विविध कोव्हिड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत. श्रीरामपूर शहरासह तालुक्यात करोनाची रुग्णसंख्या वाढत आहे.

त्यामुळे श्रीरामपूर शहरातील जनतेने करोनाचे सर्व नियम पाळून मास्क वापरा, सोशल डिस्टन्स ठेवा, सॅनिटायझरचा वापर कायम करा, असे आवाहन करण्यात आले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24