‘या’ तालुक्यातील दोन गुन्हेगार एका वर्षासाठी पाच जिल्ह्यातून तडीपार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने आक्रमक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.

नुकतेच कर्जत तालुक्यातील राशीन येथील दोघांना नगर जिल्ह्यासह सोलापुर, बीड,औरंगाबाद,पुणे या पाच जिल्ह्यातून एक वर्षाच्या कालावधीसाठी तडीपार करण्यात आले असल्याची माहिती कर्जतचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.

राम जिजाबा साळवे (वय २६), सागर नवनाथ साळवे (वय २४) दोघेही (रा.राशीन ता.कर्जत) अशी तडीपार करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. यांच्याविरुद्ध जमाव जमवून मारामारी, दरोडा, गंभीर दुखापत असे गुन्हे दाखल आहे.

दरम्यान कर्जत तालुक्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचे प्रयत्न सध्या कर्जत पोलिसांकडून सुरू आहेत. कर्जतसह इतर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या गुंडांचे तडीपारीचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते.

वरील दोघे इसम वारंवार काहीना काही गुन्हे करत असल्याने सामान्य नागरिकांच्या जिवीतास भय निर्माण झाल्याने सदर तडीपार इसम यांना तडीपार करणेबाबत पोलीस अधीक्षक मनोज पाटील,

अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांचे मार्फत उपविभागीत दंडाधिकारी, कर्जत यांचेकडे कर्जत पोलिसांनी प्रस्ताव पाठविले होते.

सदरच्या प्रस्तावांची चौकशी करून उपविभागीय दंडाधिकारी अर्चना नष्टे यांनी वरील दोन इसम यांना अहमदनगर, बीड, पुणे, सोलापूर, नाशिक अशा ५ जिल्ह्यातुन एक वर्षासाठी तडीपार करण्याचे आदेश जारी केले आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24