आरोपी गुंड च्या पोलीस कोठडीत दोन दिवसांची वाढ

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 28 जून 2021 :- बँक ऑफ महाराष्ट्र चा 98 लाख रुपयांचा गैरव्यवहार प्रकरणामध्ये येथील आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने दिल्ली येथून आरोपी प्रसाद गुंड याला मोठ्या शिताफीने पकडले होते.

या घटनेमध्ये त्याचा साथीदार अमोल गाडेकर हा मात्र फरार आहे. गुंड ला न्यायालयात हजर केले असता त्याला 30 जून पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, 98 लाख रुपयांचे कर्ज बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेतून गुंड याने घेतलेले होते,

सदर कर्जाचे हप्ते न भरल्यामुळे बँकेची फसवणूक झाल्याचे बँकेच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यांमध्ये फिर्याद दाखल केल्यानंतर या प्रकरणाचा गुन्हा हा आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला होता.

तीन वर्षानंतर येथील आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने आरोपीला दिल्लीतुन अटक केली. त्याला 27 तारखेपर्यंत पोलीस कोठडी होती.

दरम्यान गुंड याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला न्यायालयामध्ये हजर केले. न्यायालयाने त्याला 30 तारखे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे.

दरम्यान या प्रकरणातील फरार आरोपी आरोपींचा शोध घेण्यासाठी पुणे ,सातारा या ठिकाणी छापे टाकले, मात्र फरार असलेला गाडेकर हा कुठे आढळून आलेला नाही. त्याचा शोध आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक घेत आहे.

अहमदनगर लाईव्ह 24