अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :-महापालिकेच्या दोन कर्मचार्यांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे, मनपाच्या आणखी काही अधिकारी व कर्मचार्यांना करोनाबाधा झाल्याने मनपात सध्या अस्वस्थ वातावरण आहे.
शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना नागरिकांना मूलभूत सेवा-सुविधा पुरविण्यासाठी कार्यरत असलेले महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी सध्या मोठ्या प्रमाणावर करोनाबाधीत होऊ लागले आहेत.
त्यामुळे आयुक्त गोरे यांनी यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी महापालिकेच्या औरंगाबाद रस्त्यावरील मुख्य प्रशासकीय इमारतीसह माळीवाड्यातील मनपाचे जुने कार्यालय तसेच सावेडी,
झेंडीगेट, बुरुडगाव रोड येथील प्रभाग कार्यालये तसेच केडगाव व नागापूर येथील उपकार्यालयांच्या आवारात अभ्यागतांना प्रवेशबंदी केली आहे.
जे नागरिक व अभ्यागत प्रशासकीय इमारत व मनपाच्या इतर कार्यालयांमध्ये दिसून येतील, त्याला संबंधित विभाग प्रमुख व शाखा प्रमुख यांना वैयक्तिकरित्या जबाबदार धरुन त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आयुक्त गोरे यांनी दिला आहे.