नगर-दौंड रोडवरील अपघातात दोघे ठार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:- नगर-दौंड रोडवरील घारगाव शिवारातील हॉटेल निलगिरीजवळ भरधाव वेगातील अज्ञात कारने जोराची धडक दिल्याने दोघे ठार झाले.

शामराव लक्ष्मण जाधव व आंबादास मोहन वाघ (दोघे रा. हिवरखेडा, गवताडा, ता. कन्नड, जि. औरंगाबाद) असे ठार झालेल्या इसमांची नावे आहेत.

ही घटना १६ फेब्रुवारी रोजी घडली. विक्रम रुपसिंग चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बेलवंडी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

फिर्यादीचे नातेवाईक शाम जाधव व आंबादास वाघ हे शेकोटी करून शेकत असताना भरधाव वेगातील पांढऱ्या रंगाच्या कारने त्यांना चोराची धडक दिल्याने अपघात झाला. अपघातात ते जखमी होवून मृत्यूमुखी पावले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24