एकाच तासात कोविड सेंटरला तब्बल दोन लाखांची मदत

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :-कोरोना रूग्णांवर मोफत उपचार करणाऱ्या आरोळे कोविड सेंटरला रूग्ण वाढल्यामुळे ऑक्सिजन बेड वाढविणे गरजेचे होते.

यासाठी जामखेडमधील प्रशासनाने व्यापारी वर्गाला आर्थिक मदतीचे आवाहन केले या आवाहनाला प्रतीसाद देत एका तासात तब्बल दोन लाख दहा हजार रुपये जमा केले. या सामाजिक दातृत्वाबद्दल व्यापारी व अधिकाऱ्यांचे सोशल मिडीयावर कौतुक होत आहे.

हजारो कोवीड रूग्णांवर मोफत उपचार करणाऱ्या आरोळे कोविड सेंटर येथे ऑक्सिजन बेड क्षमता वाढविण्यासाठी प्रशासकीय अधिकारी तहसीलदार विशाल नाईकवाडे, गटविकास अधिकारी परसराम कोकणी,

नगरपरिषदेचे मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते, पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड, व्यापारी असोसिएशचे अध्यक्ष रमेश जरे यांनी स्वत: फिरून व्यापारी वर्गाला विनंती केली.

या विनंतीस मान देत व्यापारी वर्गाने अवघ्या १ तासात २ लाख १० हजार रुपयांपेक्षा पेक्षा जास्त रक्कम जमा झाली यामुळे ऑक्सिजन बेड वाढविण्यास मदत होईल अनेक कोरोना रूग्णांचा जीव वाचेल.

प्रशासनाच्या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देत व्यापारी वर्गाने दातृत्वाचा दाखला दिला आहे. अशाच प्रकारे सहकार्य सर्व राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक,

व्यापारी नागरिकांनी पुढे येऊन या कोवीड सेंटरला यथाशक्ती मदत करावी, असेही आवाहन यावेळी प्रशासनाकडुन करण्यात आले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24