कोरोना बाबत ‘फेक न्यूज’ दिल्याबद्दल संशयित महिलेसह दोघांना अटक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

वृत्तसंस्था :- हंगेरी देशात कोरोना विषाणूमुळे अनेक जणांचा मृत्यू झाल्याचे खोटे वृत्त प्रकाशित करणाऱ्या एका संकेतस्थळाचा भंडाफोड केल्याची माहिती शनिवारी पोलिसांनी दिली.

हंगेरीत अद्यापपर्यंत कोरोना व्हायरसचा एकही रुग्ण आढळलेला नाही. मात्र, खोट्या बातम्या देणाऱ्या एका संकेतस्थळाने अनेक लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याचा दावा केला होता. काही लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे वृत्त या संकेतस्थळावर देण्यात आले होते.

हे संकेतस्थळ तसेच फेसबुक पेज चालविणाऱ्या संशयित महिलेसह दोघांना अटक करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान संगणक उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.

जाहिरातीतून महसूल वाढविण्यासाठी खोट्या बातम्या देणारी ही वेबसाइट चालविण्यात येत असल्याची शंका पोलिसांनी उपस्थित केली आहे.

या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, संबंधित प्रकरणाचा तपास करण्यात येत असल्याची माहिती हंगेरी पोलिसांनी दिली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24