कोपरगावातून बेपत्ता झालेल्या दोन मुली सापडल्या नातेवाईकांच्या घरी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2021 :- गेल्या दोन दिवसांपूर्वीच कोपरगाव तालुक्यातून तीन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. यामुळं तालुक्यात एकच खळबळ उडाली होती.

मात्र याप्रकरणी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. कोपरगाव तालुक्यातील बोलकी, शहजापूर व शिरसगाव येथून तीन अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्यादी दाखल झाल्या होत्या.

त्यापैकी बोलकी येथील मुलगी श्रीरामपूर एमआयडीसीमधील तिच्या मामाच्या घरी सापडली तर शिरसगाव येथील मुलगी वैजापूर येथील तिच्या चुलत मावशीच्या घरी सापडली आहे.

तर शहाजापूर येथील मुलीचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, बोलकी येथील मुलीने केवळ आई रागावल्याच्या रागातून घरातून निघून गेली होती.

तर शिरसगाव येथील मुलीला सावत्र आई असून ती घरात खूप त्रास देते त्यामुळे या त्रासाला कंटाळून ती घर सोडून गेली असल्याची माहिती पोलिसांना दिली.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24