Poco X5 Series : भारतीय बाजारात ‘या’ दिवशी लाँच होणार पोकोचे दोन नवीन स्मार्टफोन, पहा स्पेसिफिकेशन्स

भारतीय बाजारात लवकरच Poco X5 आणि Poco X5 Pro लॉन्च होणार आहेत. रिलीझ होण्यापूर्वी या फोनबद्दल फीचर्स आणि स्पेसिफिकेशन जाणून घेऊया

Poco X5 Series : भारतात पोकोचे अनेक स्मार्टफोन विकले जातात. कंपनीच्या सर्व स्मार्टफोनला मोठी मागणी असते. लाँच झाल्यानंतर कंपनी इतर टेक कंपन्यांना कडवी टक्कर देते.कंपनीही सतत आपले नवनवीन फीचर्स असणारे स्मार्टफोन लाँच करत असते.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

अशातच आता कंपनी Poco X5 आणि Poco X5 Pro लाँच करणार आहे. कंपनीचा आगामी स्मार्टफोन Poco X5 Pro एक रीब्रँडेड Redmi Note 12 Pro स्पीड एडिशन आहे. ही सिरीज भारतात कधी लाँच होणार आहे जाणून घेऊया.

जाणून घ्या Poco X5 सीरिज भारतात लॉन्च करण्याची तारीख आणि विक्री

Advertisement

भारतात Poco X5 सीरिज 6 फेब्रुवारी रोजी IST संध्याकाळी 5.30 वाजता लॉन्च होणार आहे. भारतात फ्लिपकार्टवर Poco X5 आणि Poco X5 Pro खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे.

असे असतील Poco X5 चे स्पेसिफिकेशन (अपेक्षित)

  • कंपनीचा हा फोन 2400 x 1080 पिक्सेलच्या FHD+ रिझोल्यूशनसह 6.67-इंच पंच-होल AMOLED पॅनेलसह येऊ शकतो. यामध्ये 120Hz रिफ्रेश दर आणि 1200 nits कमाल ब्राइटनेस असणार आहे.
  • या फोनच्या मागच्या बाजूस 48MP मुख्य लेन्स, 8MP अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 2MP मॅक्रो सेन्सरसह ट्रिपल कॅमेरा सेटअप असणार आहे. तर सेल्फीसाठी, समोर 13MP कॅमेरा असणार आहे.
  • हे Adreno 619 ग्राफिक्ससह 6nm Qualcomm Snapdragon 695 SoC द्वारे समर्थित असणार आहे. यात 5,000mAh बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंगसाठी सपोर्ट मिळणार आहे.

असे असतील Poco X5 Pro चे स्पेसिफिकेशन (अपेक्षित)

Advertisement
  • Redmi Note 12 Pro स्पीड एडिशनच्या फीचर्सनुसार, Poco X5 Pro 10-बिट रंगांसह 6.67-इंचाच्या AMOLED डिस्प्लेसह येणार आहे.
  • यामध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 1920 PWM डिमिंग सपोर्ट असणार आहे. ज्याचे FHD+ रिझोल्यूशन 2400 x 1080 पिक्सेल असणार आहे.
  • हा स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेरा सिस्टमसह येऊन 108MP मुख्य लेन्स, 8MP अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 2MP मॅक्रो सेन्सरचा समावेश असणार आहे. समोर 16MP सेल्फी स्नॅपर असणार आहे.
  • हे 6nm स्नॅपड्रॅगन 778G SoC द्वारे समर्थित आणि 5,000mAh बॅटरी पॅक करणार आहे. यात 67W फास्ट चार्जिंग सपोर्ट असणार आहे. यात ऑडिओसाठी डॉल्बी अॅटमॉस आणि स्क्रीनसाठी डॉल्बी व्हिजन सपोर्ट देण्यात आले आहे.