अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघे जण जागीच ठार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:-शनिवारी दुपारच्या सुमारास एका दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली, यामध्ये गंगापूर (जि. औरंगाबाद) तालुक्यातील दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान हि धक्कादायक घटना नगर-औरंगाबाद महामार्गावरील प्रवरासंगम गोदावरी पुलाजवळील जुन्या सलाबतपूर रस्त्यानजीक घडली आहे.

या अपघातात प्रदीप अण्णासाहेब पाडे (वय १९, रा. वडगाव कोल्हाटी, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) व गोरख जगन्नाथ घोरपडे (वय १८, तिसगाव, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, प्रदीप पाडे, गोरख घोरपडे हे दोघे दुचाकी (क्र. एम. एच. २० डी एन ३३५४) वरून प्रवास करत होते. दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोघे जागीच ठार झाले.

त्यांचे शवविच्छेदन नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. पोलीस पथकाने घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला. याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24