अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघेजण जखमी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2021:-भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत मोटारसायकलवरील दोघेजण जखमी झाले. ही घटना निंबोडी शिवारात घडली असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरूध्द भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, आकाश संपत गायकवाड (रा.उक्कलगाव ता.श्रीरामपूर) व गणेश बापू धनवटे (रा.उक्कलगाव ता.श्रीरामपूर) हे दोघेजण मोटारसायकलवरून आष्टी येथून जामखेड रोडने नगरकडे येत होते.

ते निंबोडी गावच्या शिवारात आले असता समोरून भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या मोटारसायकलला जोराची धडक दिली.

या धडकेत मोटारसायकलवरील आकाश संपत गायकवाड,गणेश बापू धनवटे (दोघेही रा. रा.उक्कलगाव ता.श्रीरामपूर) हे दोघेजण जखमी झाले. या बाबत भिंगार कॅम्प पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरूध्द गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सफौ.मुळे हे करत आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24