iQoo smartphone : लवकरच मार्केटमध्ये धुमाकूळ घालणार iQoo चे दोन स्मार्टफोन, बघा स्पेसिफिकेशन

iQoo smartphone : रेडमी, ओप्पो, सॅमसंग, नोकिया आणि गुगल प्रमाणेच iQoo ची भारतीय बाजारात चांगलीच क्रेझ आहे. या कंपनीच्या स्मार्टफोनला ग्राहक पसंती दर्शवतात.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

जर तुम्हीही iQoo चे चाहते असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. कारण लवकरच iQoo चे दोन स्मार्टफोन पुन्हा एकदा मार्केटमध्ये धुमाकूळ घालणार आहेत.

या दिवशी होणार लाँच

Advertisement

कंपनीचा लाँच इव्हेंट 8 डिसेंबर रोजी स्थानिक वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता सुरू होईल. या दरम्यान, iQoo Neo 7 SE स्मार्टफोन iQoo 11 5G सह लाँच केला जाईल, अशी माहिती iQoo इंडोनेशिया इंस्टाग्राम हँडल अकाउंटवर दिली आहे.

iQoo 11 5G स्पेसिफिकेशन

IQ 11 5G स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर, तो Qualcomm च्या नवीनतम Snapdragon 8 Gen 2 SoC प्रोसेसर असेल. तर LPDDR5x RAM आणि UFS 4.0 स्टोरेज असेल. यात 8GB आणि 12GB पर्यंत RAM तर, 256GB आणि 512GB ऑनबोर्ड स्टोरेज पर्याय उपलब्ध असतील.

Advertisement

iQoo 11 5G मध्ये E6 AMOLED डिस्प्ले असेल, ज्याचा स्क्रीन 2K रिझोल्यूशनसह 144Hz रिफ्रेश रेट इतका असेल. फोनच्या मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप उपलब्ध असेल, यामध्ये मुख्य 50MP, अल्ट्रा-वाइड लेन्स 13MP आणि टेलिफोटो युनिट 12MP असेल. तर सेल्फीसाठी फोनच्या पुढील बाजूस 16MP कॅमेरा असू शकतो. यामध्ये कंपनीकडून 5000mAh बॅटरी दिली जाईल जी 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट करेल.

iQoo Neo 7 SE स्पेसिफिकेशन

कंपनीचा हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 8200 SoC प्रोसेसरद्वारे समर्थित असेल. यामध्ये ग्राहकांना 120Hz रिफ्रेश रेटसह AMOLED डिस्प्ले मिळेल. तर 12GB पर्यंत रॅम असेल. त्याशिवाय फोनमध्ये 5000mAh पर्यंतची बॅटरी असण्याची अपेक्षा आहे, जी 120W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.कंपनीकडून याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. हा फोन 8 डिसेंबर 2022 ला लाँच केला जाऊ शकतो.

Advertisement