अहमदनगर Live24 टीम, 1 एप्रिल 2021 :- एका टँकरचा व दुचाकींचा अपघात झाला असून यामध्ये एक जण ठार झाल्याची घटना राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी परिसरात घडली असल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान या अपघातात राहूरी फॅक्टरी येथील बापू आसाराम साळुंके यांचा मृत्यू झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि,
राहुरी फॅक्टरी येथील डाँ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याच्या पेट्रोल पंपावर दुचाकीस्वार बापू आसाराम साळुंखे हे दुचाकीमध्ये पेट्रोल टाकुन घरी निघाले होते.
यावेळी डिझेल खाली करण्यासाठी आलेला टँकरने त्यांना जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वार बापू आसाराम साळुंखे हे गंभीर जखमी झाले होते.
त्यांना उपचारासाठी नगर येथे घेऊन जात असताना उपचारापुर्वी त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.