अहमदनगर Live24 टीम, 20 फेब्रुवारी 2021:- मोटारसायकलच्या अपघातात दोन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कर्जत-मिरजगाव रस्त्यावरील पठारवाडी फाट्यावर घडली.
असून अशोक शहाजी निंबाळकर (वय ३५, रा.बहिरोबावाडी), सुरज वैभव कुलथे ( वय २२, रा. राशीन) अशी या अपघात अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.
या घटनेमुळे परीसरात शोककळा पसरली आहे. याबाबत सविस्तर असे की, अशोक निंबाळकर हा गुरुवारी सायंकाळी घराजवळ असलेल्या शेतात पायी चालत जात होता.
तो रस्ता पार करत असताना मिरजगाव येथून कर्जतकडे येत असलेल्या सुरज कुलथे याचा त्याच्या मोटारसायकलवरील ताबा सुटला. त्यामुळे त्याने पायी जाणाऱ्या अशोक याला पाठीमागून जोराची धडक दिली.
या धडकेत अशोकच्या डोक्याला जबर मार लागला. तसेच सुरज हा देखील जबर जखमी झाला. दरम्यान नागरिकांनी या दोघांना उपचारासाठी कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.
परंतु अशोक याचा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू झाला. तर सुरज यास उपचारसाठी नगर येथे नेत असताना त्याचा देखील रस्त्यातच मृत्यू झाला. दोन तरुणांचा असा अपघाती मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.