टँकर व मोटरसायकलची धडक : दोन युवकांचा मृत्य

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:-कर्जत तालुक्यातील बेनवडी येथे दुपारी ३ च्या सुमारास राशीनकडून कर्जतकडे जाणारा टँकर (एमएच १२ एनएक्स -१९५६) व कर्जतकडून कोर्टाचे काम आटोपून राशीनकडे येणारी मोटार सायकल (एमएच ४२- एबी ९८७६) यांचा भीषण अपघात झाला.

या अपघातामध्ये चिलवडी जवळील माऊलकर वस्तीवरील अजिनाथ (बाप्पू) भानुदास माऊलकर वय (४३) व प्रताप मोहन शिंदे वय (४२) हे मोटारसायकल वरील दोन युवक अपघातामध्ये जागीच ठार झाले आहेत.

याबाबत टँकरचालकावर कर्जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे चिलवडी व माहुलकरवस्ती येथे शोककळा पसरली आहे.

कर्जत तालुक्यातून अमरापूर भिगवण या सर्व मार्गाचे चौपदरीकरण सुरू आहे. मिरजगाव ते म्हणाले की, राशीन दरम्यान काम पूर्ण होत आहे.

अत्यंत चांगला रोड झाल्याने गाड्याचा वेळ मोठ्या प्रमाणात वाढला आहे व त्यामुळे अपघात होऊन त्यात जीव जाण्याचे प्रमाण ही वाढले आहे.

या अगोदर चिंचोली फाटा, पठारवाडी फाटा, कोळवडी या भागात अपघात होऊन काही व्यक्ती प्राणास मुकल्या आहेत. त्यामुळे मागरिकांनी या रस्त्यावर आपली वाहने जोरात चालवू नये,

वेग नियंत्रणात ठेवल्यास अपघाताचे प्रमाण कमी होईल याबाबत वाहन चालकांनी खबरदारी घ्यावी वारंवार आवाहन केले जाते मात्र याकडे कोणीही लक्ष देत नाही.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24