Success Story : असं म्हणतात की जर तुमचे लक्ष्य फिक्स असेल व तुम्ही त्यादृष्टीने जिद्दीने प्रयत्न सुरु ठेवले तर तुम्हाला नक्कीच यश मिळत. अनेक लोक आपल्या आयुष्यात यशाची शिखरे गाठतात. पण यामागे मोठे कष्ट आणि विविध अडचणींनी भरलेल्या मार्गावरील प्रवास असतो.
आज फायनान्स सेक्टरमधील सर्वात नावाजलेलं नाव कोणतं ? असं विचारलं तरी समोर नाव येतं कोटक महिंद्रा बँक. परंतु या बँकेची स्थापना करणारे उदय कोटक यांचा खूप मोठा प्रवास यामागे आहे. चला आपण यामागील यशोगाथा जाणून घेऊया.
उदय कोटक यांचा जन्म उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे कुटुंबीय कुटुंब कापूस व्यापार करत असत. त्यांच्या कुटुंबात एकूण ६० सदस्य होते. ज्यावेळी भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली त्यानंतर ते पाकिस्तानातील कराची येथून भारतात आले होते.
क्रिकेटची आवड
लहानपणापासूनच उदय कोटक यांना क्रिकेट खेळण्याची खूप आवड होती. पण एकदा खेळताना त्यांच्या डोक्याला चेंडू लागला. त्यामुळे ते बेशुद्ध झाले. त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी गंभीर दुखापत झाल्याचे सांगितले. या दुखापतीमुळे उदय कोटक यांना क्रिकेटला कायमचा रामराम ठोकावा लागला.
अशी रोवली गेली कोटक महिंद्रा बँकेची मुहूर्तमेढ
उदय हे एमबीएचे शिक्षण घेत होते. त्यावेळी त्यांनी कुटुंबाचा सुरु असणारा कापसाचा व्यापार न करता स्वतःचा काहीतरी वेगळा बिझनेस करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी 1985 मध्ये 60 लाख रुपयांची रिस्क घेत 300 चौरस फूट जागेत कोटक कॅपिटल मॅनेजमेंट फायनान्स लिमिटेडची सुरवात केली.
पुढे जात महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी या कंपनीत गुंतवणूक केली आणि हीच कंपनी कोटक महिंद्रा फायनान्स लिमिटेड झाली. पुढे ही कंपनी कोटक महिंद्रा बँकेच्या नावाने प्रसिद्ध झाली. 300 चौरस फूट जागेत सुरु झालेले ऑफिस आज राज्यभर पसरले आहे.
इतर क्षेत्रामध्ये सुरु केला बिझनेस
या व्यवसायात यश दिसू लागताच उदय कोटक यांनी स्टॉक ब्रोकिंग, विमा, इन्वेस्टमेंट बँकिंग, म्युच्युअल फंडांमध्ये लक्ष केंद्रित केले. येथेही ते सफल झाले. कोटक महिंद्रा अॅसेट मॅनेजमेंट कंपनी 1998 मध्ये सुरू झाली.
या कंपनीने म्युच्युअल फंडात प्रवेश केला. 2000 मध्ये, पेन आफ्रिकन इन्व्हेस्टमेंटशी टाय-अप झाला आणि उदय कोटक यांनी जीवन विमा सुरू केला. 300 चौरस फूट जागेत सुरु झालेला हा व्यवसाय जिद्दीच्या जोरावर देशभर पसरला असून उदय कोटक आज देशातील सर्वात यशस्वी बँकर म्हणून नावाजले आहेत.