उध्दव ठाकरेंनी शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांना केले ‘हे’ आवाहन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :- महाविकास आघाडी सरकारचे नेतृत्व करताना आपल्या सर्वाची मोठी जबाबदारी असल्याचे सांगत राज्य सरकारच्या योजना आणि मोहिमा यशस्वी करण्यासाठी कामाला लागण्याचे

आदेश शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यानी दिले आहेत. राज्यात सरकारच्या जाण्याच्या वावड्या उठवल्या जात आहेत.

युती – आघाडीच्या बातम्या दिल्या जात आहेत, त्याकडे लक्ष न देता आपल्याला जनतेच्या सेवेसाठी सत्ता राबवायची आहे असे ते म्हणाले.

युती- आघाडीच्या वावड्यांची चिंता करू नका आणि कामाला लागा असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यानी केले.

येत्या १२ जुलै ते २४ जुलै दरम्यान शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाचा कार्यक्रम घेण्यात येत असून त्या अंतर्गत विभागीय बैठका घेतल्या जाणार आहेत.

केंद्रात नारायण राणे यांना भारतीय जनता पक्षाने मंत्रिपद दिल्याने मुंबई आणि कोकणात शिवसेनेसमोर आव्हान वाढले आहे.

या पार्श्वभुमीवर शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची महत्वाची बैठक शिवेसना भवन येथे खासदार आणि शिवसेना सचीव अनिल देसाई यांच्या नेतृत्वात ही बैठक पार पडली.

या बैठकीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे देखील दूरदृश्य माध्यमातून सहभागी झाले. यावेळी जिल्हाप्रमुखांना त्यांच्या जिल्ह्यातील आगामी काळात होणा-या निवडणुकांप्रमाणेच कोरोना नंतरच्या स्थितीत लसीकरणाबाबत केंद्र सरकारकडून होत असलेली

दिरंगाई याबाबत पक्ष संघटना म्हणून करायच्या कामाबाबत चर्चा करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

या बैठकीत मराठा आणि इतर मागास वर्गाच्या आरक्षणाचा प्रश्न, जिल्ह्यातील, स्थानिक बेरोजगारी आणि रोजगाराचे प्रश्न

तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांसोबत असलेल्या तक्रारी कमी करून समन्वय करण्याबाबतचा आढावा घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

अहमदनगर लाईव्ह 24