‘उद्धवचा वाटा, महाराष्ट्राचा घाटा’, पहा कोठे झळकले फलक

बाळासाहेबांची शिवसेना ( शिंदे गट ) यांच्याकडून पुण्यातील बालगंधर्व चौक, फर्ग्युसन रोड या भागात उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत असणारे बॅनर झळकवले आहेत. ‘उद्धवचा वाटा, महाराष्ट्राचा घाटा’ असे बॅनर शिंदे गटामार्फत लावण्यात आले आहेत.

या बॅनरवर महाराष्ट्रातून किती प्रकल्प कधी आणि कुठे गेले आहेत त्याच्या नावाची यादी प्रसिद्ध करून उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करण्यात आले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

‘बाळासाहेबांची शिवसेना’ यांनी लावलेल्या या बॅनरवर प्रामुख्याने वेदांता फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्क, टाटा एअरबस या प्रकल्पात महाविकास आघाडी आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका काय होती आणि हे प्रकल्प महाराष्ट्रातून कोणत्या इतर राज्यात आणि कोणत्या वर्षी गेले हे सविस्तरपणे लिहिण्यात आल आहे.

वेदांता-फॉक्सकॉन त्यानंतर टाटा एअरबस हे प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेले आणि त्यानंतर महाराष्ट्रात एकच राजकारण पेटले आहे. महाविकास आघाडी आणि शिंदे फडणवीस सरकार यांच्यामधील नेते एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. याचे पडसाद आता पुण्यात उमटत आहेत.