Aadhaar Card : UIDAI ने घेतला महत्त्वाचा निर्णय! आता मोफत करता येणार आधार अपडेट

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Aadhaar Card : आता प्रत्येक 10 वर्षांनी आधार कार्ड अपडेट करणे बंधनकारक आहे. जर तुम्हाला यावर्षी तुमचे आधार अपडेट करायचे असेल तर आता तुम्हाला एक रुपया खर्च करावा लागणार नाही. सरकारने देशाभरातील कोट्यवधी जनतेला मोठा दिलासा दिला आहे.

UIDAI आता नागरिकांना आधारसाठी ऑनलाइन दस्तऐवज अपडेट करण्याची सुविधा मोफत देणार आहे. याचाच अर्थ असा की आता तुम्हाला आधार अपडेट करण्यासाठी एकही रुपया खर्च करावा लागणार नाही. परंतु, हे लक्षात ठेवा की ही सुविधा फक्त तीन महिन्यांसाठी ऑनलाइन अपडेट करण्यासाठी असणार आहे.

आधार कार्डवर उपलब्ध असणारी ही मोफत सेवा 15 मार्च ते 14 जून 2023 पर्यंत सुरू राहणार आहे. जर तुम्ही तुमची आधार कागदपत्रे अपडेट केली असतील. तुम्हाला हे काम शक्य तितक्या लवकर करावे लागणार आहे.

पूर्वी हे काम करण्यासाठी 25 ते 50 रुपये आकारले जात होते. परंतु,15 मार्च ते 14 जून 2023 पर्यंत तुम्हाला हे काम मोफत करता येणार आहे.

https://twitter.com/UIDAI/status/1636012743906959364?s=20

आधार नोंदणी आणि अपडेट रेग्युलेशन 2016 अंतर्गत, ज्यांचे आधार कार्ड जारी करण्यात आले होते त्यांना 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांच्यासाठी आधार कार्डमधील कागदपत्रे अपडेट करणे खूप गरजेचे केले आहे.

आता नागरिकांना आधार कार्डमध्ये कागदपत्रे अपडेट करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नसल्याची माहिती UIDAI ने दिली आहे. त्यामुळे हे काम लवकरात लवकर करा.