अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:- ‘दागिने स्वच्छ करुन देतो’ असे सांगून एका भामट्याने महिलेचे ३५ हजार रुपये किंमतीचे दागिने चोरुन तिची फसवणूक केल्याची घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास शहरातील मालदाडरोड परिसरातील स्वामी समर्थ नगरमध्ये घडली.
याबाबत अधिक माहिती अशी कि, अज्ञात भामट्याने या परिसरातील महिलेच्या घरात प्रवेश करुन सोन्याचे दागिने स्वच्छ करुन देतो असे सांगून यावेळी घरातील इतर भांडी स्वच्छ करुन दिली.
सदर महिलेचा त्याने विश्वास संपादन करुन साडेचार हजार रुपये किंमतीचे मिनी गंठण व ३० हजार रुपये किंमतीची सोन्याची चैन ताब्यात घेतली. सदर आरोपी पुन्हा दागिने घेवून न आल्याने सदर महिलेने शहर पोलीस ठाणे गाठले.
याबाबत सुनिता भिकाजी नेहे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरुन पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास सहाय्यक फौजदार फटांगरे हे करत आहे.