अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या मृत्यूची अफवाच

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2021 :- अंडरवर्ल्ड डॉन आणि गँगस्टर छोटा राजनला कोरोनाची लागण झाल्यानंतर उपचारासाठी दिल्लीतल्या AIIMSमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान, छोटा राजनचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. मात्र या सर्व अफवा असल्याचं स्पष्ट करण्यात आला आहे.

छोटा राजन तिहार तुरुंगात आजीवन तुरुंगवासाची शिक्षा भोगत आहे. या तुरुंगातच त्याला एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोनाची लागण झाली होती.

त्याला संक्रमण झाल्यानंतर दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्याची प्रकृती स्थिर आहे.

मात्र, शुक्रवारी दुपारी अनेक प्रसारमाध्यमे आणि सोशल मिडीयावर छोटा राजनचा कोरोनाने मृत्यू झाल्याचे वृत्त प्रसारित झाले.

हे वृत्त खोटे असून राजनवर उपचार सुरू असल्याचे एम्स रुग्णालय आणि तिहार तुरुंग प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे छोटा राजनच्या मृत्यूचे वृत्त अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

2015मध्ये इंडोनेशियातून ताब्यात घेतल्यानंतर छोटा राजनची रवानगी भारतातल्या तिहार तुरुंगात करण्यात आली. राजनला भारतात आणल्यानंतर त्याच्यावरच्या सगळ्या केसेस CBIने हाती घेतल्या.

महाराष्ट्र सरकारने आपल्याकडच्या सगळ्या केसेस CBIकडे हस्तांतरित केल्या. छोटा राजनवर खून आणि खंडणी संदर्भातील तब्बल 70 फौजदारी खटले सुरू आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24