अहमदनगर Live24 ,5 जून 2020 : कुख्यात गुंड दाऊद हा भारताचा सर्वात मोठा शत्रू आहे. दाऊद १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटांचा मास्टरमाईंड आहे आणि तो अंडरवर्ल्ड डॉन आहे.
त्याला कोरोना झाल्याचे वृत्त आहे. त्याची पत्नी महजबीनही कोरोना पॉझिटिव्ह निघाल्यानंतर त्यांना कराचीच्या मिलिटरी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेनंतर दाऊदचे सुरक्षारक्षक व इतर कर्मचारी यांना क्वारंटाईन करण्यात आले आहेत. पाकिस्तानच्या कराचीमध्ये कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत.
मात्र, पाकिस्तानकडून वारंवार या गोष्टीला नकार दिला जात आहे. दाऊद इब्राहिम बराच काळ पाकिस्तानात आपल्या कुटूंबासह लपून राहत होता.
दाऊद इब्राहिम पाकिस्तानात असल्याचा ठाम पुरावाही भारताने दिला आहे, असे असूनही पाकिस्तान हे मान्य करण्यास नकार देत आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews