व्यापाऱ्यांच्या रॅपिड टेस्टनंतर व्यवहार पूर्ववत..

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 16  जुलै 2021 :- गेल्या काही दिवसांपासून भाळवणी गावातील रूग्ण संख्या वाढत असल्याने गेल्या दोन दिवसांपूर्वी तहसीलदार ज्योती देवरे यांनी बाजारपेठेतील अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व व्यवहार आठ दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले.

या आदेशामुळे व्यापाऱ्यांमध्ये नाराजीची भावना होती. व्यापाऱ्यांनी तहसीलदार देवरे यांची भेट घेऊन दुकाने सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी निवेदन देऊन केली होती.

यावेळी सर्व व्यापाऱ्यांनी रॕॅपिड टेस्ट करून घेऊन सर्व नियमांचे पालन करण्याबाबत देवरे यांनी सांगितले. सर्व नियमांचे पालन केले, तर दुपारी चारपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात येईल, असे सांगितले.

मंगळवारी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात १२५ ते १५० व्यापाऱ्यांनी रॅॕपिड टेस्ट करून घेतली. या चाचणीत कोणताही व्यापाऱ्यांना कोरोना असल्याचे निदान झाले नाही,त्यामुळे व्यापाऱ्यांनी दुकाने सुरू केली. दुपारी चारपर्यंत व्यवहार सुरू होते.

दुकाने सुरु करण्यास परवानगी दिल्याने व्यापाऱ्यांनी प्रशासनाचे आभार मानले आहे. यावेळी अशोक रोहोकले, अविनाश राऊत, निशिकांत रोहोकले, दीपक रोहोकले, संदीप चेमटे, संतोष चेमटे,

भाऊसाहेब पट्टेकर आदींनी व्यापाऱ्यांची बैठक घेऊन नियमावली तयार करून ती काटेकोरपणे पाळून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याचे नियोजन करण्यात आले.

अहमदनगर लाईव्ह 24