file photo

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस देशभर उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने भाजपने देशभर विविध उपक्रम देखील घेतले. मात्र दुसरीकडे काँग्रेसनं हा दिवस बेरोजगार दिवस म्हणून साजरा केला.

आता याच मुद्द्यावरून आरोप- प्रत्यारोपच्या झोड उठल्या आहेत. महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी बेरोजगार दिन साजरा करण्याचे जाहीर केले आहे.

मात्र, हा त्यांचा पोरकटपणा असल्याचे कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. दरम्यान याबाबत अधिक बोलताना वहाडणे म्हणाले, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात प्रत्येक वाढदिवस हा आनंदाचा दिवस असतो.

भ्रष्टाचाराचा एकही डाग नसणाऱ्या पंतप्रधान मोदींवरही टीका करायला, आंदोलन करायला हरकत नाही. पंतप्रधान झाल्यापासून विरोधक त्यांच्यावर पातळी सोडून टीका करतच आहेत.

पण सत्यजित तांबे यांनी जरा तरी भान ठेवायला हवे. असे कुणीही उठून एका आदर्श व्यक्तीच्या वाढदिवसाला असा आचरटपणा करायला लागले आहे. अशी परखड टीका वहाडणे यांनी केली आहे.