अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2021 :- बंद घराचा कडी कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी टीव्ही, एक तोळा सोन्याचे दागिने, मोटारसायकल आदी वस्तू चोरून नेल्याची घटना नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोेबा येथे घडली आहे.
याबाबत गणेश तुकाराम बडगू (वय 47) धंदा नोकरी रा. वडाळा बहिरोबा यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार शनीशिंगणापूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीत म्हटले की, मी स्वतः गंगापूर जि. औरंगाबाद येथील शाळेत शिक्षक म्हणून नोकरी करतो.
पत्नी आजारी असल्याने नगरला उपचारासाठी अॅडमिट होती. मुलगा अथर्व (वय 15) हा घराला कुलूप लावून नगरला त्याच्या आईकडे हॉस्पिटलला गेलेला होता.
दुसर्या दिवशी सकाळी शेजारी राहणारे राजेंद्र झावरे यांनी फोनवरून सांगितले की, तुमचे घर उघडे दिसत आहे. मी व मुलगा घरी आलो असता दरवाजाचा कडी-कोयंडा तुटलेले दिसले.
घरात जाऊून पाहिले असता टीव्ही, सोन्याचे दागिने मोटारसायकल चोरीस गेल्याचे दिसून आले.या फिर्यादीवरून शिंगणापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.