तरूणांनी घेतले खड्ड्यात बुजवुन,  नगर-मनमाड रस्ता दुरुस्तीसाठी अनोखे आंदोलन

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 11 सप्टेंबर 2021 :-  नगर-मनमाड राज्य महामार्गावरचे खड्डे बुजवण्यासाठी रस्ता दुरूस्ती कृती समितीच्या वतीने  तरूणांनी राहुरी फॅक्टरी येथे स्वतः खड्यात बुजवून घेऊन अनोखे आंदोलन छेडुन आंदोलनकर्तेंनी सरकार आणि प्रशासनाचा निषेध नोंदविला.

दोन वर्षापासून रस्ता दुरुस्ती करण्यासाठी लढा सुरू आहे.अधिका-यांच्या म्हणण्यानुसार गेल्या मार्च महिण्यात काम चालु होणार होते.परंतु दुर्दैवाने काम चालु झाले नाही,नगर मनमाड खड्यामधे अनेक अपघात झाले या अपघातात अनेकांची कुटूंब उद्ध्वस्त झाले आहे.

आंदोलन हाती घेतल्यानंतर प्रशासनाने माती मिश्रीत खडीने खड्डे बुजविण्याचे सुरू केले आहे.परंतु अवघ्या एकाच दिवसात खड्डे जै थे झाले आहे.आता या आंदोलनाची दखल न घेतल्यास लवकरच तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाईल असा इशारा वसंत कदम तसेच देवेंद्र लांबे यांनी दिला आहे.

तर स्वातंञ्यानंतरही  रस्ता दुरूस्तीसाठी भांडावे लागते आहेत हे खर तर दुर्दैव आहे.आंदोलकांना खड्यात गाडून घ्यावे लागले तरी शासनाना जाग येत नाही. नामदार प्राजक्त तनपुरे, खासदार सुजय विखे,माजी मंञी शिवाजी कर्डिले यांनी या रस्त्याचा मार्गी लावावा.

आता खड्यात गाडून घेतले यापुढे खड्यांत आत्मदहन करू असा परखड इशारा यावेळी  शिवचरीञकार हसन सय्यद यांनी दिला आहे. शनिवारी नगर मनमाड राज्य महामार्गालगत राहुरी फॅक्टरी येथे हे आंदोलन छेडण्यात आले याप्रसंगी देवेंद्र लांबे, वसंत कदम,

हसन सय्यद, प्रमोद विधाटे, सोनू साळुंके, राजेंद्र साळुंके, संजय वाणी, गोटूराम वाणी,सुयोग सिनारे, मयूर मोरे, नशीब पठाण, अमोल वाळुंज,श्रीकांत शर्मा,सचिन तारडे,तुषार कदम,प्रसाद कदम,सचिन कदम,नितीन मोरे,योगेश राऊत,दुर्वेश वाणी,अमोल कदम,सुहास भांड,

जालिंदर दौंड , बाबासाहेब खांदे,संतोष कदम, अनुप राऊत, वैभव कदम, वैभव गाडे, संदेश पाटोळे, अजिंक्य गायकवाड आदींसह  कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकील , पो.हे.काॅ.डी.एन.गर्जे,अशोक शिंदे, पो ना. दादासाहेब नरोटे,दादासाहेब रोहकले,अशोक शिंदे, संतोष ठोंबरे, होमगार्ड चांगदेव कोबरणे, बाळासाहेब वराळे आदींनी चोख बंदोबस्त ठेवला.