अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2021 :- निसर्ग व पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळाचे अध्यक्ष वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांचे नुकतेच निधन झाले त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन त्यांची आठवण म्हणून
अग्नीपंख फौंडेशन व निसर्ग व पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळाने मोरे याचे सुरेगाव येथील स्मशानभूमीत मुकबधीर मित्रांच्या हस्ते ६७ लावून या वृक्षमित्राला अखेरचा सलाम केला.
वृक्षमित्र आबासाहेब मोरे यांनी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रेरणा घेऊन सन १९८५ पासुन वृक्ष लागवड व संवर्धन स्वत:चे आयुष्य समर्पित केले.
आबासाहेब मोरे यांना महाराष्ट्र शासनाने वृक्षमित्र तर केंद्र शासनाने वनश्री पुरस्काराने सन्मानित केले होते मोरे यांनी निसर्ग व पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळाची स्थापना करुन वृक्ष लागवड व संवर्धनचे कार्य महाराष्ट्र भर केले.
आबासाहेब मोरे यांनी ६७ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या कार्याचा आठवण राहावी यातून नव्या पिढीला प्रेरणा विळावी म्हणून
अग्नीपंख फौंडेशन व निसर्ग व पर्यावरण प्रदुषण निवारण मंडळाने सुरेगाव येथील स्मशानभूमीत वृक्षारोपणाचा उपक्रम राबविला त्यासाठी ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.