अहमदनगर Live24 टीम, 3 मे 2021 :-कोरोना काळात सर्वच लग्नांमध्ये चित्र बदलेललं दिसतं. पाहुण्यांना फुलांऐवजी मास्क आणि सॅनिटायजर दिलं जातंय. त्यासोबतच लग्नात वेगवेगळ्या शक्कल लढवल्या जात आहेत. असेच एक अनोखे लग्न बिहारच्या बेगूसरायमध्ये येथे झाले.
या लग्नात नवरी-नवरदेवाने सोशल डिस्टंन्सिंग पाळत काठ्यांच्या मदतीने एकमेकांच्या गळ्यात वरमाला घातल्या. हे अनोखं लग्न तेघडा अमुमंडल परिसरातील तेघरा बाजारात पार पडलं.
गिरधारीलाल सुल्तानिया यांचे पूत्र कृतेश कुमारचं लग्न बेगूसरायच्या ज्योती कुमारीसोबत ३० एप्रिलला रात्री पार पडलं होतं. काठ्यांच्या मदतीने दोघांनी एकमेकांना हार घातल्याने हे लग्न सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
या लग्नात नियमानुसार परिवारातील केवळ ५० लोकच उपस्थित होते आणि पूर्ण नियमानुसार सरकारी गाइडलाईन पालन करत हे लग्न पार पडलं. लग्नात सामिल झालेले आणि सोशल मीडियावरील लोक या जोडप्याची प्रशंसा करत आहेत.
कोरोनामुळे लग्नाचे सर्व नियम बदललेले बघायला मिळतात. असंच एक वेगळं लग्न बिहारच्या बेगूसरायमध्ये बघायला मिळालं. सध्या या लग्नाची सगळीकडे चर्चा रंगली आहे.
या लग्नात नवरी-नवरदेवाने सोशल डिस्टंन्सिंग पाळत काठ्यांच्या मदतीने एकमेकांच्या गळ्यात हार घातले. ही पद्धत अनेकांना आवडली. कोरोना काळात सोशल डिस्टंन्सिंग आणि मास्क लावण्याची गाइडलाईन जारी केली आहे.
अशात अशाप्रकारे काही लोक लग्नात नियमांचं पालन करून इतरांना जागरूकही करत आहे. नवरदेवाने सांगितले की, हे लग्न त्याच्यासाठी आठवणीत राहील. विशेष करून काठ्यांनी एकमेकांच्या गळ्यात हार घालणं.