अहमदनगर Live24 टीम, 21 एप्रिल 2021 :-पाथर्डी तालुक्यातील वृद्धेश्वर कारखाना आदिनाथनगर परीसरात तिसगाव- शेवगाव रोडवर शेरकर वस्ती शेजारी अज्ञात व्यक्तीचा अन्न पाण्यावाचून मृत्यू झाल्याचा प्रकार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
गेल्या आठवड्याभरापासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने सर्वञ लॉकडाऊन झाला असल्याने फक्त अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद आहे. त्यामुळे अनेक व्यक्ती भूकबळीलाही बळी पडत आहेत.
सोमवारी राञी आठच्या सुमारास एक अज्ञात व्यक्ती या परीसरात रस्त्याच्याकडेला भुकेने व्याकूळ असलेल्या अवस्थेत पडलेली दिसली. तेव्हा या परिसरातील नागरिकांनी त्या अज्ञात व्यक्तीस जेवायला दिले. कारण तो व्यक्ती अन्नावाचून भूकेने व्याकूळ झालेला होता.
परंतु मंगळवारी सकाळी अचानकपणे येथील राहणाऱ्या व्यक्तीना कारखान्या शेजारील घोडके वस्तीकडे जाणाऱ्या रस्तालगतच त्याच्या मृतदेह दिसून आला. त्या व्यक्तीची ओळख अजूनही पटलेली नसून तो व्यक्ती कोणत्या गावातील आहे. याचा तपास लागलेला नाही.