हिंगणगावच्या उपसरपंचपदी मोहिनी सोनवणे यांची बिनविरोध निवड

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 6 जुलै 2021 :-  हिंगणगाव (ता. नगर) ग्रामपंचायतचे उपसरपंच दिलीप झावरे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या उपसरपंचपदी मोहिनी सोनवणे यांची सर्व सदस्यांच्या उपस्थितीत नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली.

पिठासन अधिकारी म्हणून सरपंच आबासाहेब सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली. ग्रामपंचायत सदस्य दिलीप झावरे यांनी सोनवणे यांचे उपसरपंचपदी नाव सुचवल्यानंतर ग्रामपंचायत सदस्य निलम दुबे यांनी अनुमोदन दिले.

कोरोना काळात गावाचे अनेक विकासकामे प्रलंबीत आहे. गावाचा विकास हेच प्रमुख ध्येय समोर ठेऊन, सर्वांना बरोबर घेऊन गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याची भावना नवनिर्वाचित उपसरपंच मोहिनी सोनवणे यांनी व्यक्त केली.

यावेळी माजी उपसरपंच दिलीप झावरे, आशाबाई ढगे, बाळासाहेब पानसरे, ग्रामपंचायत सदस्या निलम दुबे, ग्रामपंचायत सदस्य वैभव ढगे, उद्योजक दिपकशेठ सोनवणे, हमीदपूर सरपंच छबुराव कांडेकर, शिवसेना नेते बाळासाहेब ढगे, एकनाथ झावरे, माजी ग्रामपंचायत सदस्य केशव सोनवणे,

संजय शिंदे, संभाजी कोल्हे, भाऊसाहेब सोनवणे, दत्तात्रय सोनवणे, अंजुकाका सोनवणे, निसार पठाण, इन्नूस सय्यद, मुस्ताक सय्यद, रावसाहेब सोनवणे, मनोज सोनवणे, प्रविण सोनवणे, अमोल सोनवणे,

मयूर सुंबे व ग्रामविकास अधिकारी सुजाता खर्से उपस्थित होते. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

अहमदनगर लाईव्ह 24