अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- भाजपाच्या जन आशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यानंतर २४ ऑगस्टला त्यांना अटक करण्यात आली होती.
२४ ऑगस्टला तारखेला उशिरा रात्री त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. त्यानंतर राज्याचं राजकारणात जोरदार पडसाद उमटू लागले आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा आहे. 17 सप्टेंबरपर्यंत राणेंवर कोणतीही कठोर कारवाई न करण्याचा आदेश हायकोर्टाने दिले असून राज्य सरकारने देखील त्याबाबत हमी दिली आहे.
नाशिकच्या गुन्ह्या प्रकरणी कोणतेही कठोर कारवाई करु नये, असा आदेश हायकोर्टाने दिला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांविरोधात एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं आणि त्यानंतर राज्यातलं वातावरण तापलं. राणे यांच्याविरोधात महाड, पुणे आणि नाशिक इथं गुन्हे दाखल करण्यात आले होते.
राज्यात विविध ठिकाणी दाखल केलेल्या गुन्ह्यांविरोधात नारायण राणे यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. पोलिसांच्या कारवाईला स्थगिती देण्याची राणेंच्या याचिकेत प्रमुख मागणी करण्यात आली आहे.
चुकीच्या कलमांखाली गुन्हे दाखल झाल्यानं ते रद्द करण्याचीही याचिकेत मागणी करण्यात आली आहे. आता गुन्हे रद्द करण्याच्या राणेंच्या याचिकेवर 17 सप्टेंबरला सुनावणी होणार आहे, तोपर्यंत नारायण राणे यांना अटक करु नका, असं कोर्टाने नाशिक पोलिसांना निर्देश दिले आहेत.