जिल्ह्यातील दहा हजाराहून अधिक शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2021:-  जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवेळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसला. या अवकाळी संकटामुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले.

जिल्ह्यातील काही ठिकाणी गारपीट झाली यामुळे कांदा, गहू, हरभरा, मका, ऊस, डाळिंब, टॉमेटो आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी झालेल्या वादळ-गारपिटीने तब्बल आठ हजारांपेक्षा जास्त हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये जवळपास दहा हजार शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे,अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

जिल्ह्यातील या  सात तालुक्यांमधील शेतकऱ्यांना अवकाळीचा मोठा फटका
  • शेवगाव तालुक्यातील १६ गावांमधील १ हजार १५३ शेतकऱ्यांच्या ८५४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.
  • संगमनेर तालुक्यात पाच गावांमधील ८७८ शेतकऱ्यांच्या १ हजार ३५७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.
  • पाथर्डी तालुक्यातील २४ गावांमधील ३०५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.
  • राहुरी तालुक्यात ४ गावांमधील ६ हजार ५० शेतकऱ्यांच्या ३ हजार ७३० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.
  • नेवासा तालुक्यातील ९ गावांमधील ५६६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.
  • कोपरगाव तालुक्यातील ७९० शेतकऱ्यांच्या ४९४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.
  • श्रीरामपूर तालुक्यातील २१८ शेतकऱ्यांच्या ११० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.
जिल्ह्यात २० आणि २१ मार्चला वादळ, वारा, मेघगर्जनेसह गारपीट झाली. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. श्रीरामपूर, शेवगाव, संगमनेर, पाथर्डी, राहुरी, नेवासा, कोपरगाव आणि श्रीरामपूर या सात तालुक्यांमधील ५८ च्यावर गावांना फटका बसला आहे.
  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24