Upcoming Electric Cars : बजेट तयार ठेवा ! नवीन वर्षात देशात लॉन्च होणार ‘ह्या’ इलेक्ट्रिक कार्स ; लिस्ट पाहून बसेल तुम्हालाही धक्का

Upcoming Electric Cars : भारतीय बाजारात मागच्या काही महिन्यांपासून इलेक्ट्रिक कार्सची मागणी झपाट्याने वाढत आहे. यातच केंद्र आणि राज्य सरकार आपआपल्या पातळीवर इलेक्ट्रिक व्हेईकलवर मोठा अनुदान देखील येत आहे.

यामुळे सध्या इलेक्ट्रिक कार्सची विक्री मोठ्या प्रमाणात वाढत आहे. तुम्ही देखील 2023 मध्ये नवीन इलेक्ट्रिक कार खरेदीचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला नवीन वर्षात लाँच होणाऱ्या काही इलेक्ट्रिक कार्सबद्दल संपूर्ण माहिती देणार आहोत. या माहितीचा वापर करून तुम्ही तुमच्यासाठी बेस्ट इलेक्ट्रिक कार खरेदी करू शकतात. चला तर जाणून घ्या संपूर्ण माहिती.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

 Tata Altroz EV 

यावर्षी टाटा मोटर्स त्यांच्या प्रसिद्ध ICE हॅचबॅक Altroz ची इलेक्ट्रिक व्हर्जन सादर करू शकते. यामध्ये Ziptron हाय व्होल्टेज तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे, ज्यामुळे ही कार एका चार्जवर 250-300 किमी धावू शकते. ईव्ही कार असल्याने त्याच्या डिझाइनमध्ये थोडेफार बदल केले जाऊ शकतात. याशिवाय त्याची डिजाइन अगदी ICE सारखी असू शकते.

eC3 Citroen

वर्ष 2023 च्या पहिल्या तिमाहीत, Citroën आपली इलेक्ट्रिक कार eC3 Citroën भारतात लॉन्च करू शकते. ही प्रीमियम हॅचबॅक टाटा टियागो ईव्हीशी स्पर्धा करेल. या इलेक्ट्रिक कारची किंमत 12 लाखांच्या आसपास असण्याची शक्यता आहे. ही कार 30.2kWh बॅटरी पॅकसह येऊ शकते, जी एका चार्जवर सुमारे 350 किलोमीटर अंतर कापू शकते. जरी त्याचे तपशील अद्याप पूर्णपणे ज्ञात नाहीत.

Mahindra XUV400 EV

2023 मध्ये विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या इलेक्ट्रिक वाहनांपैकी एक महिंद्रा XUV400 EV असेल. कंपनीची पहिली इलेक्ट्रिक SUV XUV400 जानेवारी 2023 पासून तीन व्हेरियंतमध्ये येईल. इलेक्ट्रिक कार एका चार्जवर 456 किमी पर्यंत धावते. ही कार 50 मिनिटांत शून्य ते 80 टक्के चार्ज होऊ शकते. त्याची किंमत 17 ते 20 लाख रुपये असू शकते.

BMW iX1

तुम्ही हाय एंड इलेक्ट्रिक SUV ची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी BMW iX1 हा सर्वोत्तम पर्याय असेल. ही इलेक्ट्रिक एसयूव्ही 2023 च्या उत्तरार्धात बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकते. त्याची किंमत सुमारे 60 लाख रुपये असेल. माहितीनुसार, कारमध्ये बसवलेले इलेक्ट्रिक इंजिन 494Nm आणि 313 हॉर्सपॉवरचा जास्तीत जास्त टॉर्क जनरेट करते.

हे पण वाचा :-  Private Bank : ग्राहक होणार मालामाल ! ‘या’ बँकेने नवीन वर्षापूर्वी दिले गिफ्ट ; घेतला ‘हा’ मोठा निर्णय