Upcoming IPO: तुम्ही देखील कमी वेळेत जास्त नफा कमवण्यासाठी नवीन IPO ची वाट पाहत असला तर आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो पुढील आठवड्यात भारतीय शेअर बाजारात आणखी एक IPO उघडणार आहे.
या IPO मध्ये तुम्ही गुंतवणूक करून मोठी रक्कम कमवू शकतात. मिळालेल्या माहितीनुसार पुढील आठवड्यात इलेक्ट्रॉनिक उत्पादन सेवा देणारी कंपनी Elin Electronics आपला IPO घेऊन मार्केटमध्ये एन्ट्री करणार आहे.
तुमच्या माहितीसाठी जाणून घ्या कि हा IPO भारतीय शेअर मार्केटमध्ये 20 डिसेंबरपासून 22 डिसेंबरपर्यंत असणार आहे. तुम्ही देखील या IPO मध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर जाणून घ्या संपूर्ण माहिती.
Elin Electronics IPO तपशील
कंपनीला आयपीओद्वारे 475 कोटी रुपये उभे करायचे आहेत. यामध्ये 175 कोटी रुपयांचे नवीन शेअर्स जारी केले जातील. याशिवाय ऑफर फॉर सेल (OFS) द्वारे 300 कोटी रुपये उभारण्याची योजना आहे. यापूर्वी कंपनीची योजना IPO मधून 760 कोटी रुपये उभारण्याची होती.
Elin Electronics IPO प्राइस बँड
एलिन इलेक्ट्रॉनिक्सचा आयपीओ 20 डिसेंबरपासून सुरू होईल. यासाठी 234 ते 247 रुपये प्रति शेअर किंमत बँड निश्चित करण्यात आला आहे. या संदर्भात, एका लॉटमध्ये 60 शेअर्स उपलब्ध होतील. किरकोळ गुंतवणूकदारांना किमान एक लॉट शेअर्ससाठी बोली लावावी लागते. एका लॉटसाठी 14820 रुपये मोजावे लागतील. तुम्ही जास्तीत जास्त 13 लॉटसाठी बोली लावू शकता. यासाठी 192660 रुपये भरावे लागणार आहेत.
निधी कुठे वापरणार?
Elin Electronics IPO मधून मिळालेली रक्कम कर्ज परतफेड आणि इतर सामान्य कॉर्पोरेट हेतूंसाठी वापरली जाईल. यामध्ये 88 कोटी रुपये कर्जफेडीसाठी वापरण्यात येणार आहेत. त्यानंतर हा निधी गोवा आणि उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील उत्पादन प्रकल्पाच्या विस्तारासाठी आणि अपग्रेडेशनसाठी वापरला जाईल. आम्ही तुम्हाला सांगतो की सप्टेंबर 2022 पर्यंत कंपनीवर एकूण 102.42 कोटी रुपये कर्ज होते.
हे पण वाचा :- Tax Saving Tips: जाणून घ्या ‘ह्या’ चार मार्ग ज्याद्वारे तुम्ही पगारावर वाचवू शकता टॅक्स ; होणार मोठी बचत