Kia Seltos 2023 : लवकरच लाँच होणार अपडेटेड किआ सेल्टोस, मिळणार तगडी फीचर्स

Kia Seltos 2023 : किआने भारतीय बाजारात आपले स्थान निर्माण केले आहे. कंपनी सतत शानदार फीचर्स असणाऱ्या कार्स लाँच करत असल्यामुळे कंपनीच्या कार्सना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. काही दिवसांपूर्वी कंपनीने सेल्टोस फेसलिफ्ट सादर केली आहे.

अशातच कंपनी आता आपल्या ग्राहकांना आणखी एक गिफ्ट तयारीत आहे. लवकरच अपडेटेड किआ सेल्टोस लाँच होणार आहे. यामध्येही कंपनी शानदार फीचर्स देत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

असे असेल इंजिन

Kia India 1.4-लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन आपल्या लाइन-अपमधून सोडू शकते असा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये केला आहे. हे इंजिन 2023 मॉडेलसाठी नवीन 1.5-लिटर टर्बोचार्ज्ड इंजिनने बदलले जाणार आहे. खरं तर, 1.4-लिटर टर्बो एप्रिल 2023 पासून लागू होणार्‍या नवीन ड्रायव्हिंग नियमांचे पालन करत नाही.

नवीन 1.5-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन सध्याच्या टर्बो इंजिनपेक्षा जास्त पॉवरफुल असणार आहे. जे एकूण 158 bhp ची पॉवर आणि 260 Nm चा पीक टॉर्क जनरेट करेल. तसेच 6-स्पीड मॅन्युअल आणि 7-स्पीड DCT गियरबॉक्स दोन्ही पर्याय उपलब्ध असून ते सध्याच्या 1.5-लीटर एस्पिरेटेड पेट्रोल आणि 1.5-लीटर डिझेल इंजिनसह SUV ऑफर केली जाऊ शकते.

फीचर्स

या कारमध्ये पॅनोरॅमिक स्क्रीन डिस्प्ले येऊ शकतो. जे 10.25-इंच इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि 10.25-इंच मध्यवर्ती डिस्प्ले एकत्र करेल. इन्फोटेनमेंट सिस्टम वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्लेला सपोर्ट करेल. त्याशिवाय आता नवीन डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आणि पॅनोरामिक सनरूफ सारखी फीचर्स आपल्याला यामध्ये पाहायला मिळतील.

सेफ्टी फीचर्स

यामध्ये प्रगत सेफ्टी फीचर्स असतील. अपडेटेड एसयूव्हीला रडार-आधारित ड्रायव्हर सहाय्यता प्रणाली मिळेल. तर ADAS तंत्रज्ञान अ‍ॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, ब्लाइंड स्पॉट डिटेक्शन, लेन फॉलोइंग असिस्ट,ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग,रिअर क्रॉस ट्रॅफिक असिस्ट, सेफ एक्झिट वॉर्निंग, ब्लाइंड-स्पॉट असिस्ट, हाय बीम असिस्ट आणि ड्रायव्हर अटेंशन वॉर्निंग यांसारखी फीचर्स ग्राहकांना मिळतील.

सादर केली आहे सेल्टोस फेसलिफ्ट

कंपनीने नुकतीच लॉस एंजेलिस मोटर शोमध्ये नवीन सेल्टोस फेसलिफ्ट सादर केली आहे. या कारचे भारतीय मॉडेल जागतिक मॉडेलसह डिझाइन अपडेट्स सामायिक करेल.

यामध्ये फुल प्रोजेक्शन एलईडी हेडलॅम्पसह मोठे टायगर नोज ग्रिल, नवीन बंपर, डीआरएल, फ्रंट ग्रिलवर स्टार मॅप सिग्नेचर लाइटिंग आणि एलईडी टेल-लाइटसह इंटिग्रेटेड वर्टिकल आकाराचे फॉग लाइट्स कंपनीने दिली आहेत. तसेच या शिवाय ग्राहकांना 1.5-लिटर व्हेरियंटला ऑडी सारखे एलईडी अनुक्रमिक टर्न इंडिकेटर मिळतील.